Friday, December 5, 2025

/

बेळगावात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरणाऱ्या मिशन ऑलंपिक संघटनेविषयी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक’ यांच्या वतीने बेळगाव येथे भव्य ‘मिशन ऑलिम्पिक अखिल भारतीय कुस्ती स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २५ व २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रामनाथ मंगल कार्यालय, अनगोळ, बेळगाव येथे होणार आहे.

विविध खेळांतील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया’ ही संघटना सन २०१७ पासून कार्यरत आहे. भारतातील अनेक राज्यांतून विविध खेळांच्या माध्यमातून या संघटनेचे कार्य सुरू आहे.

‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन इंडिया’ ही संघटना भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कंपनी कायदा कलम ६ नुसार नोंदणीकृत असून, अधिकारास पात्र आहे. या संघटनेची ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’ यांसारख्या उपक्रमांमध्ये नोंदणी झाली आहे. तसेच, ‘मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स अँड युथ अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया’ येथेही नोंदणी झाली आहे. यासोबतच, संघटनेकडे आयएसओ (ISO), नीती आयोग आणि ‘टाफिसा’ यांसारख्या महत्त्वाच्या नोंदण्या आहेत. तसेच, ही संघटना ‘इंटरनॅशनल ऑलिम्पिक स्पोर्ट ऑर्गनायझेशन कमिटी’ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अखत्यारीत भारतात कार्यरत आहे. संस्थेचे ‘१२अ’ , ‘८०जी’ आणि ‘सीएसआर’ रजिस्ट्रेशन असून, सर्व प्रशासकीय कागदपत्रे पूर्ण आहेत.

 belgaum

संघटनेचा मुख्य उद्देश सामान्य खेळाडूंना स्पर्धात्मक खेळाचे चांगले व्यासपीठ मिळवून देणे आणि त्यांना खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा आहे. क्रीडा स्पर्धांबरोबरच क्रीडा क्षेत्रातील इतर उपक्रमही संघटनेतर्फे राबवले जातात.

येत्या २५ व २६ ऑक्टोबर रोजी रामनाथ मंगल कार्यालय, बेळगाव येथे होत असलेल्या अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेत पैलवान, वस्ताद (कुस्ती प्रशिक्षक) आणि कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पै. अतुल शिरोळे (एनआयएस कोच) आणि अध्यक्ष-मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन, कर्नाटक यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.