Friday, December 5, 2025

/

‘भगवा’ फडकविल्या प्रकरणी  यांच्या विरुद्ध दोषारोप  दाखल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिका कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांनी लावलेला कन्नड ध्वज हटवण्याची धमकी देऊन, कोनेवाडी गावात भगवा ध्वज फडकवून दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, न्यायालयाने ५ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे.

दिनांक २१ जानेवारी २०२१ रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर कन्नड समर्थक संघटनांनी कन्नड ध्वज उभारला होता. मराठी भाषिक समुदायाचे सदस्य हा ध्वज हटवतील, असे सांगत महाराष्ट्राचे शिवसेना  नेते विजय  देवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भगवा ध्वज फडकावला होता.

दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, विजय देवणे आणि त्यांच्या साथीदारांनी एकत्र येऊन, भगवा ध्वज फडकावून घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 belgaum

या सगळ्यांनी भगवा ध्वज फडकवून त्याचे फोटो काढले आणि नंतर ते फेसबुकवर पोस्ट केले. यामुळे कन्नड आणि मराठी भाषिक समुदायांमध्ये तेढ निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला होता. या प्रकरणी, विजय देवणे, संग्रामसिंग  कुपेकर देसाई, सुनील  शिंत्रे, अमृत  जत्ती आणि संतोष लक्ष्मण मळवीकर या पाच जणां विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले  आहे.


शनिवारी बेळगाव कोर्टात महाराष्टातील या नेत्यांची सुनावणी झाली वकील म्हणून शामसुंदर पत्तार आणि हेमराज बेंचनावर यांनी काम पाहिले यावेळी समिती नेते रमाकांत कोंडुस्कर, माजी महापौर शिवाजी सुंठकर ,शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.