बेळगावच्या ‘डेक्कन मेडिकल सेंटर’ची आरोग्यसेवेत २५ वर्षांची यशस्वी सेवा
‘डीएमसी’ रौप्यमहोत्सवी वर्षात
मानवतावादी दृष्टिकोन व आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम : डेक्कन मेडिकल सेंटर
रुग्णकेंद्रित दृष्टिकोन आणि नैतिक मूल्यांवर आधारित आरोग्यसेवेचा २५ वर्षांचा प्रवास पूर्ण
१०० खाटांचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ६ क्रिटिकल केअर युनिट्ससह सुसज्ज
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या वेगाने विकसित होणाऱ्या बहुसांस्कृतिक विभागात, खानापूर-गोवा महामार्गालगत गुड्सशेड रोड येथे, डेक्कन मेडिकल सेंटर हे अत्याधुनिक आणि मानवतावादी दृष्टिकोन असलेल्या आरोग्यसेवेचा दीपस्तंभ म्हणून उदयास आले आहे. सुमारे २७,४५० चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर उभारलेले हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि हृदयस्पर्शी रुग्णसेवेचा सुंदर संगम आहे.
सन २०२५ हे वर्ष डेक्कन मेडिकल सेंटरच्या दैदिप्यमान वैद्यकीय प्रवासात अत्यंत महत्त्वाचे आहे. बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले हे हॉस्पिटल आपला रौप्यमहोत्सव – म्हणजेच २५ वर्षांच्या अखंडित व यशस्वी सेवेचा प्रवास साजरा करत आहे. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेने एका लहान आरोग्यकेंद्र म्हणून आरंभ करून, आज उत्तर कर्नाटकमधील सर्वात विश्वासार्ह आरोग्य केंद्र म्हणून मान्यता प्राप्त केली आहे. नीतिमूल्यांवर आधारित, रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन आणि उज्ज्वल भविष्यदृष्टीची पुन्हा एकदा खात्री करून देणारे हे वर्ष असून, प्रदीर्घ रुग्णसेवेची ही पावती आहे.
परिपूर्ण रुग्णसेवेसाठी व्रतस्थ असलेले डीएमसी हे १०० खाटांनी सज्ज असून, त्यामध्ये ६ अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिट्स, तसेच अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज २ मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स यांचा समावेश आहे. हे केवळ एक हॉस्पिटल नसून, समग्र आरोग्य सेवेचे एक लोकप्रिय नाव आहे, जे रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक बरेपणावर भर देते. तीव्र आजार असोत की दीर्घकालीन विकार – डीएमसी रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना अखंड विश्वासार्ह अशी सेवा देते.

या रुग्णालयात निवासी व बाह्य तज्ज्ञांचा समावेश असून, सामान्य औषधोपचार, हृदयरोग, मधुमेह, अस्थिरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, मूत्रविकार, बालरोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, श्वसनरोग, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी आणि आहारतज्ज्ञ सेवा असे प्रमुख विभाग कार्यरत आहेत. सर्व विभागांना इन-हाऊस फार्मसी, डायग्नोस्टिक लॅब्स, एनआयसीयु आणि कार्डियाक केअर युनिट्स यांचा समग्र पाठबळ आहे, ज्यामुळे डीएमसी हे एक संपूर्ण समाकलित आरोग्यसेवा केंद्र म्हणून नावारूपास आले आहे.
डॉ. रमेश दोडण्णावर यांच्या नेतृत्वाखाली डेक्कन मेडिकल सेंटरची रुग्णसेवा अत्यंत सक्षमपणे सुरू असून, डॉ. दोडण्णावर हे जनरल मेडिसीन व कार्डिओ-डायबेटोलॉजीचे नामवंत तज्ज्ञ असून, त्यांना ४५ वर्षांहून अधिक वैद्यकीय अनुभव आहे. जेएनएमसीचे सुवर्णपदक विजेते असलेले डॉ. दोडण्णावर हे आपल्या रुग्ण-केंद्रित दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध आहेत. डॉ. सवित्री दोडण्णावर, या संस्थेच्या प्रशासन संचालिका व स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील ज्येष्ठ सल्लागार, ज्यांचा ३२ वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे.
परवडणारी, सहज उपलब्ध आणि नैतिक आरोग्यसेवा यावर भर देणाऱ्या डीएमसीने उत्तर कर्नाटकमध्ये वैद्यकीय गुणवत्ता आणि विश्वासाचे अधिष्ठान निर्माण केले आहे. बेळगाव शहराचा विकास जसजसा होत आहे, रौप्य महोत्सवी डेक्कन मेडिकल सेंटर हे दया, सचोटी व समर्पणाच्या बळावर चाललेल्या सेवा प्रवासाची साक्ष देत तत्परतेने कार्यरत आहे. भविष्यात, डीएमसी आपली सेवा, सुविधा आणि अधोरेखित मूल्ये यांचा विस्तार करत राहणार असून, या प्रदेशातील सर्वात विश्वासार्ह बहु-विशेषज्ञ रुग्णालय होण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करीत आहे.




