belgaum

डीसीसी बँक निवडणूक : ७ जागांवर उमेदवार आजमावणार नशीब

0
42
Dcc bank
Dcc bank
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या डीसीसी बँकेच्या सात जागांसाठी १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत एकूण ६७६ पात्र मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी दिली आहे.

शुक्रवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालेल. बी. के. मॉडेल हायस्कूलमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडेल आणि मतदारांना ओळखपत्र पाहूनच प्रवेश दिला जाईल. निवडणूक केंद्रात मोबाईल फोन वापरण्यास कोणालाही परवानगी नसेल.

निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. येथे सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वैद्यकीय आणि अग्निशमन यंत्रणा यासह सर्व आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. उमेदवार आणि माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत.

 belgaum

निवडणूक निर्णय अधिकारी श्रवण यांनी स्पष्ट केले, “जर मतदानाच्या गोपनीयतेचे उल्लंघन झाले, तर ते मत त्वरित अपात्र ठरवण्यात येईल.” निवडणूक कार्यासाठी एकूण ३३ कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही निवडणूकबाह्य गतिविधींना परवानगी नसेल.

निवडणूक बॅलेट पेपरद्वारे होणार असून, मतमोजणीनंतर त्याच दिवशी प्रमाणपत्रे वितरित केली जातील. शहर पोलीस आयुक्तांच्या सहकार्याने मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सख्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयात धाव घेण्यात आली असल्याने, न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच, त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.