बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्णसौध येथे सीमा संरक्षण आयोग आणि कर्नाटक सीमा विकास प्राधिकरणाचे प्रादेशिक कार्यालय स्थापन करण्यात यावे, बेळगाव नेहरूनगर येथे सात कोटी रुपयांतून उभारण्यात आलेले कन्नड भवन हस्तांतरीत करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गडीनाडू कन्नड सेना या संघटनेने दिला आहे.
राज्याध्यक्ष बलराम मासेनट्टी म्हणाले, कन्नड भवन आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसह सर्व समुदायांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीकिफायतशीर भाडेदरात देण्यात यावे. एका संघटनेने कन्नड भवन बेकायदेशीरपणे वापर सुरू केला आहे. १५ ते २० हजार रुपयांपर्यंत भाडे आकारणे, भाडेपट्टी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणे, असा प्रकार होत असल्याचा आरोप केला.
बेळगावात अनेक कानडी संघटना कन्नड साठी आक्रमक होत असताना आरोप सुरू झाले आहेत. जर १ नोव्हेंबरपर्यंत कन्नड भवनचे हस्तांतरण झाले नाही तर आम्ही तीव्र संघर्ष सुरू करू असा इशारा मासेनाट्टी यांनी दिला.
अशोक चंदरगी यांनीही बेळगाव सुवर्णसौध येथे सीमा संरक्षण आयोग आणि कर्नाटक सीमा विकास समिती सुवर्ण सौध येथे सुरू करा अशी मागणी केली आहे.







