बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा सपाटा सुरू आहे.
दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी टिळकवाडी आणि हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यांनी केलेल्या कारवाईत एकूण तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय विश्वनाथ घंटामठ आणि त्यांच्या पथकाने अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या दोन व्यक्तींवर कारवाई केली. पहिला आरोपी प्रमल गजानन पाटील (२६), रा. रघुनाथ पेठ, अनगोळ, दुसरा आरोपी शंकर भीमप्पा मलतवाडी (२५), रा. कनकदास कॉलनी, अनगोळ या दोघांनाही अटक करून वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करून त्यांच्याविरुद्ध टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून तपास सुरू आहे.
दुसऱ्या एका कारवाईत, हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय चिक्के मिटगार आणि त्यांच्या पथकाने अवैध दारू विक्रीवर छापा टाकला. शेखर हनमंत तळवारी (४७), रा. वालकी गल्ली, के.के. कोप्प, हा कोळीकोप्प याला अटक करण्यात आली आहे.
आरोपीकडून ‘हिरिजनल चॉइस डिलक्स’ कंपनीचे ९० मिलीचे १४० सॅशे (एकूण ४.१४० लिटर) किंमत रु. १,८४०/- असे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरुद्ध हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
या दोन्ही कारवायांमधून एकूण ३ गुन्ह्यांमध्ये ३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी एका आरोपीकडून रु. १,८४०/- किंमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पीएसआय आणि कर्मचारी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्तांनी (डीसीपी) कौतुक केले आहे.



