बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहर पोलिसांनी सुरू केलेल्या चाकू प्रतिबंधक तपासणी मोहिमेत एपीएमसी माळ मारुती आणि उद्यमबाग पोलिसांनी बेकायदेशीर रित्या बाळगलेली शस्त्रे जप्त करत कारवाई केली आहे.
माळ मारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत सांबरा ब्रीज जवळ संशयास्पद रित्या फिरताना वाहनाची व्यक्तीची तपासणी करताना पोलिसांनी आप्पार अब्दुल शेख वय 42 रा. पाचवा क्रॉस मुल्ला गल्ली न्यू गांधीनगर बेळगाव याची तपासणी केली असता होंडा डियो गाडीमध्ये धारदार शस्त्र आढळले पोलिसांनी त्याला अटक करत दुचाकी आणि बेकायदेशीर शस्त्र जप्त केले आहे.
आणखी एका तपासणी दरम्यान उद्यमबाग चाकू प्रतिबंधक पथकाने मजगाव वाल्मिकी गल्ली येथील मंजू सितीमणी यांच्या इनोवा कारची तपासणी केली असता गाडीत कट्यार आणि धारदार शस्त्र आढळले आहे.
तर एपीएमसी पोलिसांनी रावडी शीटर राहुल ज्योतिका जाधव याच्या दुचाकीची शाहूनगर भागात तपासणी केली असता रिकाम्या हीरोइन पॅकेटसह दोन पॉईंट वीस ग्रॅम हीरोइन आढळले आहे राहुल जाधव याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला तर शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांवर भारतीय शस्त्रास्त्र कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.