बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या पारंपारिक भव्य दिव्य श्री शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणुकीला अल्पावधी प्रारंभ होत आहे.
कायदा व सुव्यवस्था भंग न होता सदर मिरवणूक शांततेने सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेतली असून सर्वत्र व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्फोटकं शोध पथकाकडून आज श्वानपथक आणि डिटेक्टरच्या सहाय्याने मिरवणूक मार्गाची संपूर्ण तपासणी करण्यात आली. यावेळी रस्त्यावर आढळून येणाऱ्या बेवारस संशस्यास्पद वस्तूंची मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने पडताळणी केली जात होती.

श्री शिवजयंती उत्सव चित्रपट मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी बेळगाव शहर आणि पारगाव च्या तब्बल सुमारे 2000 पोलिसांना तैनात करण्यात आले आहेत.
मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी 550 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची केवळ मिरवणूकच नव्हे तर इतर ठिकाणीही नजर असणार आहे.


