बेळगाव लाईव्ह : सराफ गल्लीतील पंच कमिटीने शिवजयंतीच्या औचित्याने एक अभिनव उपक्रम राबवत गल्लीतील सर्व रहिवाश्यांची संपर्क माहिती असलेली फोन डिरेक्टरी तयार केली असून, हा उपक्रम इतरांसाठीही अनुकरणीय ठरत आहे.
सराफ गल्ली पंच कमिटीने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत गल्लीतील प्रत्येक नागरिकाचा संपर्क क्रमांक एकत्र करून एक फोन डिरेक्टरी तयार केली आहे. ह्या डिरेक्टरीचे प्रकाशन शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आले. या उपक्रमामागील उद्देश अत्यंत स्तुत्य आहे.
कोणत्याही नागरिकाला अडचण असो की आनंदाचा क्षण, फक्त एका फोनकॉलवर सर्वांनी एकत्र यावे, ही संकल्पना घेऊन ही डिरेक्टरी तयार करण्यात आली. या फोन डिरेक्टरीमुळे गल्लीतील सामाजिक ऐक्य, परस्पर सहकार्य आणि वेळेवर मदत करण्याची भावना अधिक बळकट होईल.
ह्या उपक्रमात हभप शंकर बाबली महाराज यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून, सराफ गल्ली पंच कमिटीने दाखवलेला हा मार्ग इतर सामाजिक गल्ल्यांसाठीही एक आदर्श ठरेल, यात शंका नाही.
