बेळगाव लाईव्ह : जम्मू कश्मीर मध्ये भारत पाकिस्तान सीमेवर कशी परिस्थिती आहे? बेळगाव परिसरातले कार्यरत जवाना अशी वेध सेवा बजावत आहेत त्यांच्या कुटुंबीयांनी सीमे लगतच्या परिस्थितीची माहिती माध्यमांना दिली.
शनिवारी रात्रीपासून जरी सीमेवर गोळीबारी काही प्रमाणात कमी झाली आहे मात्र त्या अगोदरच ज्यावेळी गोळीबारी सुरू होती तेव्हाच सीमेवर करायला जवानांनी आपापल्या कुटुंबांना घराकडे रवाना केले आहे.
युद्धाच्या या गंभीर परिस्थितीत, सैनिकांनी आपल्या पत्नी आणि मुलांना सुरक्षिततेसाठी त्यांच्या गावी पाठवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत, धारवाड जिल्ह्यातील दोन वीरपत्नी नुकत्याच जम्मू-काश्मीरमधून आपल्या गावी परतल्या आहेत.तीन दिवसांचा रेल्वे प्रवास करून त्या बेळगावला पोहोचल्या आणि त्यानंतर आपल्या गावी रवाना झाल्या. यापैकी एक वीरपत्नी, सीमा निकम यांनी जम्मू-काश्मीरमधील भयाण परिस्थिती कथन केली.
बेळगावला परतलेल्या सीमा निकम यांच्या म्हणण्यानुसार युद्धाचे ढग जमा झाले असताना, जिथे पती रात्रंदिवस उपाशी-तहानलेले सीमेवर सेवा करत आहेत, त्यांना सोडून येणे माझ्यासाठी खूप कठीण होते. जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सायंकाळ होताच पूर्ण अंधार केला जातो.

सायबर हल्ल्याच्या शक्यतेमुळे पती फोनवरही बोलू शकत नव्हते. आम्ही सर्वजण वरच्या मजल्यावरून खाली अंधाऱ्या खोलीत बसून राहायचो. लहान मुलांनाही आवाज करण्याची परवानगी नव्हती. आमचे घर सीमेपासून केवळ २५ किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही सायरन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचे आवाज ऐकले आहेत. तेथील नागरिक अत्यंत गंभीर आणि भयावह परिस्थितीत जगत आहेत. सर्व काही लवकर ठीक व्हावे, अशी माझी प्रार्थना आहे.
दुसऱ्या वीरपत्नी, अश्विनी हळीगेरी यांनी सांगितले, जम्मूमध्ये सायरनचा आवाज ऐकताच आम्ही घाबरून अंधारात खाली जाऊन बसायचो. जम्मू-काश्मीरच्या सीमेवर सध्या भीतीचे वातावरण आहे. माझ्या पतीला सोडून यायला मन तयार नव्हते, पण सगळ्यांना घरी पाठवत असल्यामुळे मलाही परतयावे लागले. तिथल्या परिस्थितीची आठवण झाली तरी डोळ्यात पाणी येते.
या वीरपत्नींच्या हृदयद्रावक कहाण्यांमुळे जम्मू-काश्मीरमधील तणावपूर्ण आणि भीतीदायक परिस्थितीची कल्पना येते. सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या कुटुंबांना किती कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे, हे यावरून स्पष्ट होते. सध्या सीज फायर झाल्याने युद्ध बंद आहे मात्र युद्धाच्या भयानक परिस्थितीचे वर्णन या वीर जवान पत्नीने केले आहे. अशा परिस्थितीत सीमेवर लढणाऱ्या जवानांना सॅल्यूट तर आहेत मात्र त्यांच्या कुटुंबीयांना देखील सलाम केले पाहिजे.