बेळगाव लाईव्ह : प्रादेशिक हवाई प्रवास सुधारण्यासाठी एक मोठा प्रयत्न म्हणून स्टार एअरलाईन्स मे 2025 पासून दोन नवे उड्डाण मार्ग सुरू करण्याबरोबरच विद्यमान मार्गावर क्षमता वाढवून बेळगावहून आपले कामकाज वाढवण्यासाठी सज्ज झाले आहे. हे बदल शहराकडे आणि शहराबाहेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी चांगली सुलभता आणि अधिक सोयीचे आश्वासन देणारे आहेत.
बेळगाव -हैदराबाद उड्डाणे 20 मे पासून सुरू : स्टार एअर येत्या 20 मे 2025 पासून बेळगाव आणि हैदराबाद दरम्यान एक नवीन हवाई संपर्क सुरू करणार आहे. ही सेवा दर मंगळवार आणि बुधवारी अशी आठवड्यातून दोनदा चालेल. विमान एस5119 बेळगावहून सकाळी 8:00 वाजता निघेल आणि हैदराबादमध्ये सकाळी 9:05 वाजता उतरेल. परतीच्या प्रवासात विमान एस5120 हैदराबादहून संध्याकाळी 4:35 वाजता उड्डाण करेल आणि संध्याकाळी 5:40 वाजता बेळगावला परत येईल. सुरुवातीच्या रु. 3,099 पासून सुरू होणाऱ्या प्रवास भाड्यासह प्रादेशिक मार्गांवर आराम आणि वेगासाठी ओळखले जाणारे 50 आसनी एम्ब्रेर ईआरजे 145 जेट विमान या मार्गावर सेवा देईल.
बेंगलोर-बेळगाव नवी उड्डाणे 1 मे पासून : स्टार एअरलाईन्स 1 मे 2025 पासून आठवड्यातून तीन वेळा बेंगलोर आणि बेळगावला जोडणारी एक नवीन सेवा देखील सुरू करेल. विमान एस5105 दर सोमवार, गुरुवार आणि रविवारी दुपारी 2:00 वाजता बेंगलोर होऊन उड्डाण करेल आणि 3:10 वाजता बेळगावमध्ये उतरेल. परतीच्या प्रवासात विमान एस5106 बेळगावहून रात्री 9:00 वाजता निघेल आणि रात्री 10:10 वाजता बेंगलोरला पोहोचेल. या मार्गावर देखील ईआरजे 145 विमानच वापरले जाईल. ज्यामुळे दोन्ही शहरांमधील जलद आणि विश्वासार्ह प्रवास सुनिश्चित होईल.
मुंबई मार्गाला मिळाले मोठे विमान : वाढत्या प्रवाशांच्या मागणीला प्रतिसाद देताना स्टार एअर 15 मे 2025 पासून ईआरजे 145 विमाना ऐवजी मोठ्या एम्ब्रेर ईआरजे 175 विमानाने आपला दैनंदिन बेळगाव-मुंबई मार्ग अद्ययावत करत आहे. हे विमान 76-आसनी जेट विमान असून जे अधिक जागा आणि चांगल्या इन-फ्लाइट सुविधा देते. विमान एस5111 सकाळी 7:40 वाजता बेळगावहून निघेल आणि सकाळी 8:50 वाजता मुंबईत पोहोचेल. परतीचे विमान एस5112, मुंबईहून दुपारी 4:50 वाजता निघेल आणि संध्याकाळी 6:00 वाजता बेळगावला पोहोचेल. या घडामोडींमुळे बेळगावचे प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र म्हणून स्थान मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल पडत असून ज्यामुळे उत्तर कर्नाटक आणि त्यापलीकडील प्रवाशांसाठी हवाई प्रवास जलद, अधिक वारंवार आणि अधिक आरामदायी होणार आहे.


