Saturday, January 18, 2025

/

रेल्वेचा सी. राहुल ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आपल्या धिप्पाड साचेबद्ध पिळदार शरीर सौष्ठवाचे सर्वोत्कृष्ट उठावदार सादरीकरण करत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या सी. राहुल याने बेळगाव येथे सतीश जारकीहोळी फाउंडेशनने पुरस्कृत केलेल्या 16 व्या वरिष्ठ पुरुष व महिला शरीर सौष्ठव आणि वुमन फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप -2025 या राष्ट्रीय स्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धेतील सर्वोच्च प्रतिष्ठेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब हस्तगत केला. याबद्दल त्याला रोख 3 लाख रुपयांच्या घसघशीत पारितोषिकाने गौरविण्यात आले. महाराष्ट्राच्या शशांक वाकडे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ किताबाचा मानकरी सर्बो सिंग हा ठरला. स्पर्धेचे सांघिक विजेतेपद सर्वाधिक 285 गुणांसह रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड संघाने पटकावले.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) मान्यतेने रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लब यांनी कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन या संघटनांच्या सहकार्याने सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर सलग तीन दिवस आयोजित उपरोक्त राष्ट्रीय स्पर्धा काल गुरुवारी रात्री उशिरा क्रीडाप्रेमींच्या तुफान गर्दीत यशस्वीरित्या पार पडली.

सदर स्पर्धेत आयबीबीएफशी संलग्न देशभरातील रेल्वे, सेनादल, पोलीस, आयकर वगैरे विभागांसह 43 राज्यस्तरीय संघटनांच्या 500 मातब्बर शरीरसौषठवपटूंनी सहभाग दर्शवला होता. 55 किलो ते 100 किलो वरील या दरम्यान विविध 10 वजनी गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांवर कर्नाटक सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारहोळी यांच्या यांच्या फाउंडेशनतर्फे रोख 30 लाख रुपयांच्या बक्षिसांची अक्षरश: खैरात करण्यात आली. दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब विजेत्या रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डच्या सी. राहुल याला टायटल आणि रोख 3 लाख रुपयांसह आकर्षक असा भव्य करंडक बक्षीसा दाखल प्रदान करून सन्मानित केले गेले.

उपविजेत्या महाराष्ट्राच्या शशांक वाकडे याला 1 लाख रुपयांचे आणि बेस्ट पोझर किताबाचा मानकरी सर्बो सिंग याला 25 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेच्या पुरुष व महिला विभागातील प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 50000, 40000, 30000, 25000 व 20000 रुपयांची रोख पारितोषिक हे प्रदान करण्यात आली.

16 व्या वरिष्ठ पुरुष शरीर सौष्ठव स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते स्पर्धक यानुसार) पुढीलप्रमाणे आहे. 55 किलो वजनी गट : संतोष यादव (महाराष्ट्र), नितेश शंकर कोलेकर (महाराष्ट्र), आर. गोपाळकृष्ण (तामिळनाडू), सुरज सिंग लंगाडिया (उत्तराखंड), मोईरंगमयूर राहुल मिटाई (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड). 60 किलो गट : नितीन म्हात्रे (महाराष्ट्र) राजेश घाडगे (विदर्भ), कांता बाळा कृष्णा (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), लाइशराम नेता सिंग (मणिपूर), अमन कुमार पंडित (नवी दिल्ली).

65 किलो गट : परीक्षित हजारीका (आसाम), प्रताप काळकुंद्रीकर (कर्नाटक), बापन मकुलदास (महाराष्ट्र) अजित सिंग जामवाला (जम्मू काश्मीर), वैभव महाजन (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड). 70 किलो गट : राजू खान (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), पंचाक्षरी भिमान्ना लोणार (महाराष्ट्र) बिश्वजीत बिश्वास (झारखंड), विघ्नेश (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), पंकज सिंग बिश्त (उत्तराखंड). 75 किलो गट : के हरीबाबू (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), अमित कुमार भुयन (ओडीसा), प्रशांत खन्नूकर (कर्नाटक), निलीन सतीश (केरळ), जगन्नाथ कुंतीया (ओडीसा). 80 किलो गट : सी राहुल (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), विकास कुमार (नवी दिल्ली), जितेंद्र कुमार पोलाई (ओडीसा), ओमकार भूषण नलवडे (महाराष्ट्र), गौरव कुमार (हरियाणा).Body building c rahul

85 किलो गट : चित्तरेश नतेसन (सेंट्रल सिव्हील सर्व्हिसेस कल्चरल अँड स्पोर्ट्स बोर्ड), समीरान नंदी (पश्चिम बंगाल), रवींद्र मलिक (हरियाणा), गणेश रघुनाथ जाधव (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), अश्वत सुजाण (कर्नाटक). 90 किलो गट : आर. कथीकेशवर (सेंट्रल सिव्हील सर्व्हिसेस कल्चरल अँड स्पोर्ट्स बोर्ड), मोहन सुब्रमण्यम शंकर (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), अश्फाक मोहम्मद (झारखंड), अमेय रंजन सेठी (ओडिसा), प्रदीप ठाकूर (मध्य प्रदेश). 90 ते 100 किलो गट : सानिध्य बिश्त (उत्तराखंड), प्रशांत कुमार सिंग (झारखंड), नीलकंठ घोष (झारखंड), राजकुमार एम. (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), केशव देधा (नवी दिल्ली). 100 किलो वरील वजनी गट : शशांक वाकडे (महाराष्ट्र), जावेद अली खान (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड) निलेश दगडे (महाराष्ट्र), अल्ताफ खान (मध्य प्रदेश), विल्सन नॉन्जमिकापाम (मणिपूर).

बेस्ट पोझर’ : सर्बो सिंग, सांघिक विजेतेपद : रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड (285 गुण), सांघिक उपविजेतेपद : महाराष्ट्र संघ (270 गुण), सांघिक तृतीय क्रमांक : झारखंड संघ (70 गुण), चॅम्पियन ऑफ चॅम्पियन : सी. राहुल (रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड), चॅम्पियन ऑफ चॅम्पियन उपविजेता : शशांक वाकडे (महाराष्ट्र).

सलग तीन दिवस आयोजित राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेची 16 वी वरिष्ठ पुरुष व महिला शरीर सौष्ठव स्पर्धा आणि वुमन फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिप -2025 यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) अध्यक्ष रमेशकुमार, सचिव हिरल सेठ, वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अँड फिजिक फेडरेशनचे सचिव चेतन पठारे, मिस्टर वर्ल्ड प्रेमचंद डिगरा, मधुकर तळलकर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे संयोजक सचिव बेळगावचे आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच अजित सिद्दन्नावर,  अविनाश पोतदार ,स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर मि. इंडिया सुनील आपटेकर यांच्यासह कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स व बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्य व स्पर्धेच्या परीक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.