बेळगाव लाईव्ह : प्रेम विवाह करण्यास नकार दिल्याने डबल मर्डर झाल्याचा प्रकार निपाणी तालुक्याच्या अकोळ गावात घडला आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील अकोळ गावामध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण निपाणी तालुका हालवून गेला आहे.प्रेम विवाह करण्यासाठी प्रियकराने क्रूर पणे दुहेरी खून केला आहे.
या घटनेबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार अकोळ गावच्या रवी आणि प्राजक्ता
या समुदायातून येणाऱ्या प्रियकर प्रेयसी
प्रेमविवाहासाठी मुलीच्या आई आणि भावाचा
विरोध होता त्यामुळे रागाच्या भरात प्रियकराने क्रूरपणे दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला आहे.
रवी आणि प्राजक्ता यांच्या प्रेम विवाहास नकार दिल्याच्या विरोधातून बुधवारी रात्री प्रियकर रवी याने प्रेयसी प्राजक्ता याच्या अचानकपणे घरी जात करत प्रेयसीची आई मंगल नायक वय 45 आणि प्रेयसी प्राजक्ताचा भाऊ प्रज्वल नायक वय 18 या दोघांचा धारदार शस्त्राने वार करत खून केला आहे.
या डबल मर्डर घटनेने पूर्ण निपाणी हादरला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.बेळगाव जिल्ह्यातील निपाणी ग्रामीण पोलीस अंकात सदर घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी प्रियकर रवी आणि प्रियसी प्राजक्ता या दोघांना अटक केलेली आहे.