Monday, December 16, 2024

/

शेतजमिंनीसाठी एआयकेकेएमएसच्या नेतृत्वाखाली आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :गेल्या 70 वर्षापेक्षा अधिक काळापासून शेती करत असलेल्या सरकारी जमिनी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात या मागणीसाठी एआयकेकेएमएस कर्नाटक राज्य समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आंदोलन छेडण्यात आले आहे.

बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एआयकेकेएमएस कर्नाटक राज्य समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी धरणे सत्याग्रह करण्यात येत आहे. गेल्या 70 वर्षापेक्षा अधिक काळापासून ज्या सरकारी जमिनीमध्ये आपण शेती करत आहोत.

त्या शेतजमिनी आम्हा शेतकऱ्यांच्या नावे करण्यात याव्यात अशी संबंधित शेतकऱ्यांची मागणी आहे. आंदोलन स्थळी बेळगाव लाईव्हशी बोलताना एआयकेकेएमएस कर्नाटक राज्य समितीचे पदाधिकारी महेश एस. बी. यांनी सांगितले की, आजच्या आंदोलनात सहभागी शेतकरी हे गेल्या 70 वर्षापासून त्यांना दिलेल्या सरकारी जमिनीमध्ये शेती करत आहेत.

गेल्या सात दशकात सदर शेतकऱ्यांनी सरकारी जमिनीची व्यवस्थित देखभाल करून त्यावर आपली उपजीविका सुरू ठेवली आहे. हे लक्षात घेऊन सरकारने त्या जमिनीचे हक्कपत्र संबंधित शेतकऱ्यांच्या नावे करावीत अशी सातत्याने मागणी केली जात आहे.Protest

मात्र सदर मागणीकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपण कसत असलेल्या जमिनी आपल्या नावावर व्हाव्यात यासाठी आवश्यक अर्ज क्र. 50, 53, 57 भरून देखील त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या नाहीत, आणि म्हणूनच आम्ही आज हे राज्य पातळीवरील आंदोलन छेडून सरकारचे आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत.

सरकारने आमच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देऊन सरकारी शेत जमिनींचे हक्कपत्र संबंधित शेतकऱ्यांकडे सुपूर्द करावेत, असे महेश म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.