Wednesday, December 4, 2024

/

सन्मित्रच्या खो-खो स्पर्धा जाफरवाडीचा संघ विजयी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येळ्ळूर येथील सन्मित्र फौंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुलामुलींच्या खो-खो स्पर्धा रविवारी नवहिंद क्रिडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद बसवाण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने व उपविजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने तर तृतीय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळविला, तसेच मुलींच्या गटाचे विजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने, द्वितीय क्रमांक भावकेश्वरी यडोगा संघाने आणि तृतीय क्रमांक अलतगा हायस्कूल अलतगा संघाने मिळविला.

स्पर्धेत मुलांच्या गटात एकूण 12 संघांनी आणि मुलींच्या गटात एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेतील मुलांच्या गटातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून बसवण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघातील नंदीश पाटील, उत्कृष्ट रनर म्हणून नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघातील किशोर मालुचे व उत्कृष्ट चेजर म्हणून बसवण्णा स्पोर्ट्स जाफरवाडी संघातील विनायक पाटील यांची निवड करण्यात आली.

तर मुलींच्या गटातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघातील सानिका चिट्टी व उत्कृष्ट रनर म्हणून प्रणाली बिजगरकर आणि उत्कृष्ट चेजर म्हणून यडोगा संघातील अपेक्षा निलजकर यांची निवड करण्यात आली.

तत्पूर्वी स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी सन्मित्र फौंडेशन चे संस्थापक  वाय. सि. गोरल सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेणुग्राम सायकलिंग क्लबचे राजु नायक, डॉ. अमित पिंगट उपस्थित होते. ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, उद्योजक एन.डी. पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.Kho kho

छञपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन राजु नायक यांनी केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत सन्मित्रचे चेअरमेन राजकुमार पाटील यांनी केले तर सन्मित्र फौंडेशनचे अध्यक्ष सतिश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

व्यासपीठावर नवहिंद क्रीडा केंद्राचे अध्यक्ष शिवाजी सायनेकर व कार्यकारिणी, हणमंत कुगजी, मुख्याध्यापक मोहन पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, प्रसाद मजुकर, लक्ष्मण हुंदरे, सतिश धामणेकर, पत्रकार मजुकर सर, रणजित गोरल, के. एन. कर्लेकर‌,गोविंद टक्केकर उपस्थित होते. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक श्री राजु नायक व मैदानाचे पुजन नवहिंदचे सेक्रेटरी आनंद पाटील यांनी केले.

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. शाम पाटील, बाळू देसुरकर माजी ए.पी.एम. सी. सदस्य बेनकनहळळी, उद्योजक संजय बेळगावकर, मुख्याध्यापक बबन कानाशिडे,परशुराम मंगणाईक, नितीन गोरल, मारुती कुट्रे, संदीप कुगजी, अभिषेक देसूरकर, आनंद गोरल,मकरंद बेळगावकर, कृष्णा चिट्टी, अजित गोरल व शिक्षक संघटना येळ्ळूरचे पदाधिकारी,मुर्तिकुमार माने, मधु नांदुरकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सन्मित्र च्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. पंच म्हणुन सुधीर माणकोजी, नितीन नाईक, महेश सिद्धानी, एन. आर. पाटील, बाळकृष्ण धामणेकर, प्रकाश गोरल, श्रीधर बेन्नाळकर,राजु जाधव,मष्णू डोंबले,उमेश बेळगुंदकर यांनी काम पाहिले.स्पर्धेला गावातील अनेक पतसंस्थांचे पदाधिकारी, देणगीदार, गावातील मंडळे व प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुत्रसंचालन चेतन हुंदरे यांनी तर चांगाप्पा कर्लेकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.