बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील वीरसौध येथे काँग्रेस पक्षाच्या विस्तृत कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली. 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त ही सभा आयोजित करण्यात आली होती.
बेळगावमधील वीरसौध येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विस्तृत कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले. 1924 मध्ये महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेस अधिवेशनाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या सुरुवातीला एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वीरसौधपर्यंत 100 मीटरचा पायी प्रवास केला. त्यांच्या सोबत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी सर्व नेत्यांनी ‘नवसत्याग्रह’ असा संदेश देणारा महात्मा गांधींचा फोटो हातात धरून वीरसौधमध्ये प्रवेश केला.
वीरसौधमध्ये प्रवेश केल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकावला. त्यानंतर खर्गे, राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि इतर नेत्यांनी गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यांनी प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
सभेत प्रमुख नेत्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, रणदीपसिंह सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल, अशोक गेहलोत, सचिन पायलट, कमलनाथ, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यांच्या सह हिमाचल मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्कु, तेलंगणा मुख्यमंत्री रेवांत रेड्डी सहभागी झाले होते.
यांचा समावेश होता.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी या सभेला अनुपस्थित होत्या. सभेमध्ये 200 हून अधिक काँग्रेस राष्ट्रीय नेत्यांनी सहभाग घेतला. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने गांधीजींच्या विचारांचे स्मरण करणे, पर्यावरण संवर्धनासाठी संदेश देणे, आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणे, हे या सभेचे मुख्य उद्दिष्ट होते.