बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात वक्फ बोर्डासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. आज पहिल्यांदाच राज्यातील वक्फ बोर्डाच्या निवडणुका बेळगावात शांततेत पार पडल्या.
या निवडणुकीत बेळगाव, बेंगळुरू, म्हैसूर आणि गुलबर्गा यासह राज्यभर मतदान झाले. बेळगावात वक्फ बोर्डाच्या मुतवल्ली विभागाच्या दोन महत्त्वाच्या जागांसाठी मतदान झाले.
वक्फ निवडणुकीसाठी बेळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, उपविभागीय अधिकारी श्रावण नाईक आणि उत्तर कर्नाटकाशी संबंधित आमदार आसिफ सेठ यांनी निवडणुकीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
बेळगाव वक्फ बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. या निवडणुकीत प्रमुख रूपात मुतवल्ली विभागातील जागांसाठी मतदान झाले, ज्यात एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या वक्फ संस्थांच्या व्यवस्थापनासाठी निवडणूक पार पडली.
या निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात 59, धारवाडमध्ये 39, बागलकोटमध्ये 111, विजापूरमध्ये 33, कारवारमध्ये 15, गदगमध्ये 78, आणि गदगमध्ये 17 मतदारांनी मतदान केले आहे. निवडणुकीचा निकाल 30 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर होईल.