बेळगाव लाईव्ह:रायबाग -कुडचीचे माजी आमदार एस. बी. घाटगे यांनी स्थापन केलेले एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी असून विशेष म्हणजे दारिद्र्यरेषेखालील रुग्णांसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये मोफत वाॅर्ड उपलब्ध आहे.
गेल्या सात वर्षात आम्ही सुमारे 80,000 रुग्णांवर उपचार केले असून जवळपास 4000 मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावचे वैद्यकीय अधीक्षक आणि प्राचार्य डाॅ. आदीवेश अरकेरी यांनी दिली.
लक्ष्मी टेकडी, गणेशपुर रोड येथील एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे आज शुक्रवारी सकाळी संस्थेबद्दल माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलबद्दल माहिती देताना रायबाग -कुडची मतदार संघाचे माजी आमदार एस. बी. घाटगे यांच्या समर्थ नेतृत्व व मार्गदर्शनाखाली 2017 साली हॉस्पिटलची आणि 2019 मध्ये कॉलेजची स्थापना झाल्याचे प्राचार्य डाॅ. अरकेरी यांनी सांगितले.
माजी आमदार घाटगे गेल्या 20 वर्षांपासून राजकीय क्षेत्रात असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात 17 प्रतिष्ठित संस्था स्थापन केले असल्याची माहिती दिली. आता वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातही सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी अध्यक्ष -संस्थापक एस बी घाटगे यांनी आमचे चेअरमन अनिल घाटगे व व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मानसी घाटगे त्यांच्या प्रयत्नातून एसबीजी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल 2019 पासून अस्तित्वात आले आहे.
आमच्या संस्थेने आतापर्यंत 80 हजार रुग्णांची वैद्यकीय सेवा केली आहे. या खेरीज उदात्त हेतूतून आम्ही बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात सुमारे 4000 मोफत आरोग्य तपासणी व वैद्यकीय उपचार शिबीरं भरवली आहेत.
आमचे हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी असून आमच्या येथे आयुर्वेदिक उपचारासह योगा, फिजिओथेरपी आणि ऍलोपॅथी सेवा उपलब्ध आहे. तसेच इन पेशंट (आयपीडी) आऊट पेशंट (ओपीडी) विभाग उपलब्ध असून क्लिनिकल लॅबोरेटरी, डायग्नोस्टिक युनिट, ऑपरेशन थिएटर, मेडिकल मॅनेजमेंट, सर्वसामान्य प्रसुती विभाग, माता -शिशु आरोग्य सुश्रुषा विभाग या सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत.
आमच्याकडील पंचकर्म सेवा अतिशय प्रभावी आणि विशेष असून ज्यासाठी आयुर्वेद व ऍलोपॅथीमधील 40 हून अधिक स्पेशालिटी कन्सल्टंट सहकार्य करतात. याबरोबरच आमच्या चेअरमनांच्या नेतृत्वाखाली दारिद्र्यरेषेखालील गरीब लोकांसाठी आमच्या हॉस्पिटलमध्ये 20 खाटांच्या मोफत वार्डची सुविधा उपलब्ध आहे.
या ठिकाणी सर्व प्रकारच्या रोगांवर उपचार करण्याबरोबरच सेवा सुश्रुषा शुल्क, डॉक्टरांचे शुल्क, खाटेचे भाडे वगैरे सर्व शुल्क माफ केले जाते. फक्त जेवणखाण व अन्य किरकोळ गोष्टींसाठीचा खर्च रुग्णाच्या कुटुंबीयांना उचलावा लागतो. अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक व प्राचार्य डाॅ. आदीवेश अरकेरी यांनी दिली. त्याचप्रमाणे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.