बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे बिर्ला इंटरनॅशनल स्कूल, बेळगाव येथे आयोजित 24 व्या रोटरी विज्ञान मेळाव्याची नुकतीच उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वी सांगता झाली. मेळाव्याचे ‘सर्वसाधारण अजिंक्यपद’ केएलई इंटरनॅशनल स्कूलने पटकावले.
बिर्ला इंटरनॅशनल स्कूल बेळगाव पुरस्कृत सदर दोन दिवसांच्या या विज्ञान मेळाव्यात 300 हून अधिक सहभागी आणि 500 हून अधिक अभ्यागत सहभागी झाले होते.
रोटरी क्लब ऑफ बेळगाव गेल्या 25 वर्षांपासून दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन करत आहे. हा अनोखा उपक्रम विज्ञान मॉडेल प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा, वैज्ञानिक विषयांवर वक्तृत्व आणि दैनंदिन जीवनात विज्ञानाच्या वापरावर व्हिडिओ रील स्पर्धा यांसारख्या विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कलागुणांचे प्रदर्शन करण्यास मदत करतो. या दोन दिवसीय मेळाव्याचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. तसेच अभ्यागतांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या या अनोख्या मेळाव्याचे कौतुक केले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावने आयएनएसईएफ प्रादेशिक विज्ञान मॉडेल प्रदर्शनासाठी सायन्स सोसायटी ऑफ इंडियाशी भागीदारी केली आहे. विज्ञान मॉडेल प्रदर्शनातील विजेते राष्ट्रीय मेळ्यात सहभागी होण्यासाठी पात्र आहेत.
गेल्या शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी सांगता झालेल्या 24 व्या रोटरी विज्ञान मेळाव्याचे ‘सर्वसाधारण अजिंक्यपद’ केएलईच्या इंटरनॅशनल स्कूलने जिंकली, तर केएलएस पब्लिक स्कूल उपविजेते ठरले.
सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. सुहास चांडक, सचिव रो. डॉ. मनीषा हेरेकर, युवा सेवा संचालक रो. प्रताप नलवडे, उपक्रमाचे चेअरमन रो. राजेश शिंगनमक्की, रो. प्रमोद अग्रवाल, रो. लक्ष्मीकांत नेतलकर, रो. विशाल कुलकर्णी, रो. अमित साठे , रो. संतोष पावटे, रो. विक्रांत, रो. गौरव, रो. शरण, रो. मॅन्युअल, रो. नेत्रा देसाई आदींसह रोटरी क्लब ऑफ सीबीएएलसी च्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.