Saturday, December 28, 2024

/

निलजी येथे छत्र. धर्मवीर संभाजी महाराज मूर्तीचा लोकार्पण सोहळा थाटामाटात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर बेळगाव तालुक्यातील निलजी या गावात निलजी ग्रामस्थ आणि श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

या कार्यक्रमासाठी महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रसाद मेडिकल्स मॉलचे संचालक सी के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे व्यासपीठ पूजन सामाजिक कार्यकर्ते जयवंत बाळेकुंद्री यांच्या हस्ते पार पडले,

तर विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम, मारीहाळ पोलीस स्थानकाचे सीपीआय गुरुराज कल्याणशेट्टी, निलजी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सतीश शहापूरकर, निलजी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा विनंती गोमानाचे, हर्षा शुगर्सचे संचालक मृणाल हेबाळकर, भरत पाटील, राघवेंद्र कोचेरी, आदींसह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री गणेश मूर्ती पूजन, श्री भगवद्गीता पूजन, श्री शिवमुर्ती पूजन, श्री भारत माता प्रतिमा पूजन पार पडले. गावातील रस्त्यांवरून वाजत गाजत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, आपण आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. संभाजी महाराजांप्रमाणेच अनेक वीरपुरुषांच्या मूर्ती, पुतळे आपण उभारलेले पाहतो. परंतु या वीर महापुरुषांचे विचार आपण अंगीकारत नाही. छत्रपती शिवाजी महाराज, धमवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले. त्यांचे विचार, आचार, आदर्श आजच्या पिढीने अंगीकारणे महत्वाचे आहे. बेळगावमध्ये स्वाभिमानाने जगायचे असेल तर तरुण पिढीने सुशिक्षित होणे गरजेचे आहे. चालीरीती, रूढी, परंपरा यामध्ये आपला समाज मागे पडत चालला आहे. त्यामुळे आता आपण यातून बाहेर पडून हातात लेखणी घेऊन आपले भविष्य उज्वल करणे गरजेचे आहे. लेखणी घेऊन भविष्य लिहिल्यास उद्या देशावर राज्य करता येणे शक्य आहे. आपली संस्कृती जतन करणे गरजेचे आहे.Nilaji

अधिकार गाजवायचा असेल तर अधिकारी पदापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. परस्रीचा आदर, व्यसनमुक्तीकडे वाटचाल करत आपण आपले भवितव्य घडवायचे आहे, असे विचार रमाकांत कोंडुसकर यांनी मांडले. यावेळी त्यांनी विकासकामांच्या नावावर जनतेची दिशाभूल करणाऱ्या राजकारण्यांना फटकारत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आदर्शांचे पालन करून राज्य कसे चालवावे याबाबत टोलाही लगावला.

यावेळी सुदर्शन शिंदे यांचे व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, तरुण – महिला मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिव-शंभूप्रेमि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.