Monday, February 10, 2025

/

अरगन तलावात आई मुलाची आत्महत्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह:  अरगन तलावामध्ये झोकून आई आणि मुलाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. कविता बसवंत जुनेबेळगावकर रा. कलखांब समर्थ बसवंत जुने बेळगावकर रा. कलखांब अशी  मयत आई  आणि मुलाचे नाव आहे.

याबाबत समजलेल्या अधिक माहितीनुसार कॅम्प येथील विनायक मंदिरा शेजारील अरगन तलावात दोन मृतदेह तरंगत होते मिलिटरी प्रशासनाने याची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

एच इ आर एफ (HERF)आणि फेसबुक फ्रेंड सर्कल या संघटनेच्या माध्यमातून तलावावर तरंगत असलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले त्यावेळी मृतदेह सोबत मिळालेल्या सुसाईड नोट मध्ये नवऱ्याने दारू पिऊन मारहाण केल्याने आणि सासू-सासर्‍यांनी त्रास दिल्याने मुलगा आणि आपण आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद आहे त्यामुळे यातूनच या आई लेकराने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त होत आहे.Camp

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच एच इ आर एफ आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल संघटनेचे बसवराज हिरेमठ, संतोष दरेकर अवधूत तुडवेकर आदींनी प्रयत्न करून पाण्यावर तरंगत असलेल्या मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या तीन दिवसांपूर्वी पाण्यात झोकून पुढे घेतले असावी आणि त्यानंतर मृतदेह पाण्यात तरंगल्यामुळे या ही घटना उघडली झाली आहे.

सदर आत्महत्या केलेल्या आई आणि मुलाने तलावा बाहेर चप्पल काढले होते आणि पाण्यात उडी घातली होती गेल्या दोन-तीन दिवसात  आजूबाजूच्या पोलिस स्थानकात बेपत्ता झालेल्या यादीनुसार तपास केला असता कलखांब येथील आई मुलगा बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानुसार ओळख पटवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना बोलवण्यात आले होते. नातेवाईकांनी ओळख पटवल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी हलवण्यात आले.सदर घटनेची कॅम्प पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.