Monday, December 23, 2024

/

देशाला वक्फची गरज नाही : आम. यत्नाळ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विजयपुरातील आमदार बसनगौडा यत्नाळ यांनी वक्फ संपूर्णपणे रद्द करण्याची ठाम मागणी केली असून, देशाला वक्फची आवश्यकता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आज माजी आमदार अरविंद लिंबावळी यांच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजपचे अंतर्गत मतभेद स्पष्ट झाले असून वक्फ च्या विरोधात भाजपच्या स्वतंत्र गटाने नवे आंदोलन छेडण्याची तयारी दाखविल्याचे स्पष्ट होत आहे.

नलीनकुमार कटील यांच्यानंतर बी. वाय. विजयेंद्र यांची पक्षाच्या राज्याध्यक्षपदी निवड होताच पक्षातील काही गटांमध्ये असहमतीचे सूर उमटले, याचेच प्रतिसाद आता स्वतंत्र बैठका आणि भाजप नेत्यांच्या विधानांवरून दिसून येत आहेत.

आज आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, आमदार रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर मंत्री जमीर अहमद यांनी विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यात वादग्रस्त विधानं केली असून, त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे आरोप करण्यात आले आहेत. यामुळे प्रशासनात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

माजी आमदार अरविंद लिंबावळी यांनी बोलताना सांगितले की, वक्फशी संबंधित अनेक समस्या भाजपकडे येत आहेत. विजयपुरमध्ये यत्नाळ यांनी या विषयावर आंदोलन सुरू केले होते, ज्यामुळे केंद्र सरकारच्या विधी दुरुस्तीसाठी रचलेल्या संयुक्त समितीच्या अध्यक्षांनी भेट दिली.

यामुळे तात्पुरती शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर या कालावधीत जनजागृती अभियान राबवण्यात येईल. या मोहिमेच्या आयोजनासाठी विशेष वॉर रूम सुरू करण्यात येणार आहे,

आणि वक्फच्या समस्या नोंदवण्यासाठी 9035675734 हा वॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. तक्रारदारांना थेट भाजप नेत्यांकडेही माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.