बेळगाव लाईव्ह : हुक्केरी तालुक्यातील बेनकनहोळी गावाजवळील घटप्रभा नदीत रविवारी संध्याकाळी मच्छीमारीसाठी गेलेल्या एका कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले, हुक्केरी तालुक्यात हि दुर्दवी घटना घडली असून मच्छीमारीसाठी गेलेल्या वडील आणि दोन मुलांसह एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये लक्ष्मणराम अंबली (वय 49), त्यांचा मोठा मुलगा रमेश अंबली (वय 14) आणि धाकटा मुलगा यल्लप्पा अंबली (वय 12) यांचा समावेश आहे. मच्छीमारी करताना नदीच्या प्रवाहामुळे तिघेही वाहून गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. सोमवारी एन.डी.आर.एफ. पथकाच्या मदतीने शोधकार्याला प्रारंभ करण्यात आला.
परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.