Thursday, November 28, 2024

/

पावसाची पुन्हा दमदार हजेरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मागील दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली असून मंगळवारी काही ठिकाणी झालेल्या पावसानंतर आज बेळगाव शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे.

उष्म्यामध्ये वाढ झाल्याने पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली होती. सोमवारी सायंकाळी पावसाचा केवळ शिडकावा झाला. मंगळवारी सायंकाळी शहरासह ग्रामीण भागातही दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाळा सुरुवात झाली असून सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला आहे.

या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले व व्यावसायिकांची तारांबळ उडाली. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या विजयादशमी ची तयारी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली असून अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांनाच आडोसा शोधावा लागला.Mhadai

हवामान खात्यानेही पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली होती. सकाळी ढगाळ वातावरण आणि सायंकाळी ३.३० च्या दरम्यान अचानकपणे ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. काही भागामध्ये जोरदार तर काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.Navratri

सध्या भातपिकासह सोयाबीन, भुईमूग, बटाटा ही पिके काढणीसाठी आली आहेत. मात्र पावसामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सोयाबीन काढणी जोरात सुरू आहे. मात्र सायंकाळी होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. बटाटा आणि भुईमूगदेखील काढणी सुरू आहे.

पण पावसामुळे काहीजणांनी हे काम थांबवले आहे. सध्या लव्ह्या जातीच्या भातांची सुगी करण्याच्या तयारीत शेतकरी आहे. मात्र पावसामुळे त्यांनी सुगीला सुरुवात केली नाही.Navratri

भातकापणी केल्यानंतर पाऊस झाला तर पिकाचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातकापणी थांबवली आहे. पावसाने उघडीप दिली तर सुगीला सुरुवात होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.