बेळगाव लाईव्ह : शहरातील रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत अनावश्यक भटकंती आणि उपद्रव करणाऱ्यांना रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेऊन चांगलीच तंबी दिली आहे.
शहरात काल रात्री गस्तीवर असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी रस्त्यावर अनावश्यक भटकंती आणि उपद्रव करणाऱ्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांचा तपशील घेऊन त्यांना चांगली ताकीद देण्यात आली.
रात्रीच्या वेळी घडणाऱ्या चोरी आणि अन्य अनुचित घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ही कारवाई सुरू केली असून ती प्रदीर्घकाळ चालणार आहे.
सोशल मीडियावरील आपल्या पोस्टच्या माध्यमातून बेळगाव शहराच्या पोलीस उपायुक्तांनी (कायदा व सुव्यवस्था) ही माहिती दिली आहे.
सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती प्रसारित झाली असून एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुकही होत आहे. शिवाय रात्रीच्यावेळी कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या कामगारांना या कारवाईचा त्रास होऊ नये, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.
https://x.com/DCP_LO_Belagavi/status/1840918413830758557