बेळगाव लाईव्ह: डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती आणि माजी खासदार अण्णासाहेब जोले यांचा लोकसभा निवडणुकीतील लढतीचा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराशी काही संबंध नाही असे स्पष्टीकरण अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी दिले.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन हे प्रशासकीय दृष्टिकोनातून चांगले आहे असे सुचवताना त्यांनी जिल्ह्याचे विभाजनाबाबत सुरुवातीपासूनच पुढे गोकाकाने बेळगाव या तीन जिल्ह्याबाबत आग्रह आहे असेही नमूद केले.
गुरुवारी बेळगावातील शासकीय विश्रामदामात डीसीसी बँके संदर्भात बैठक सुरू असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
एका वर्षाच्या आत बँकेचे सदस्य न झाल्यास तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळत नाही हा कायदा आहे . सदस्यत्वाचा संभ्रम दूर झाला तर सर्व काही सुरळीत होईल याबाबतीत सर्व नेत्यांशी मी पक्षपातपणे चर्चा झाली आहे ते त्यांनी स्पष्ट केले.
डीसीसी बँकेच्या ठेवी 7 हजार कोटी वरून 10,000 कोटी वर नेण्याचे आमचे लक्ष आहे. सर्व तक्रारींचे निराकरण करणे ही रमेश खत्री अध्यक्ष यांची जबाबदारी आहे डीसीसी बँक ही जुनी आणि भक्कम बँक आहे कर्मचारी मनापासून सेवा करत आहेत असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी नैतिक जबाबदारीखाली राजीनामा दिल्याची आणि आरोप झाल्यावर तपासाला सामोरे न जाण्याची अनेक उदाहरणे आहेत. हे सर्व लक्षात घेऊन राजीनामा द्यायचा की नाही हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर अवलंबून आहे.
वाल्मिकी निगम घोटाळा हा मुडापेक्षा मोठा असतानाही भाजप गप्प का आहे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, वाल्मिकी निगम घोटाळ्यातील दोषींवर यापूर्वीच सुनावणी झाली असून त्यांनी राजीनामाही दिला आहे. मात्र मुडाचा तपास अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे मुडावर जास्त भर दिला जात आहे. पक्षाध्यक्षांनी जुळवून घेण्याचा प्रश्नच येत नाही. बसून चर्चा करून मतभेद मिटवणे चांगले आहे, असे विधान यत्नाळांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना व्यक्त केले.