Thursday, November 21, 2024

/

बेळगावच्या कपिलची हॉटेल व्यवसायातील विराट …भरारी

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : ध्येयाने वेडे होणे म्हणजे काय? हे बघायचं असेल तर उद्यमबाग येथील हॉटेल विराट कडे एकदा चक्कर मारलीच पाहिजे. छोट्याश्या चायनीज विकणाऱ्या, टपरी पासून गेल्या 20 वर्षापूर्वी तांगडी गल्ली येथील युवकाने आपल्या व्यवसायाचा विराट वृक्ष जो उभा केला त्याची यशोगाथा समजून घेतलीचं पाहिजे.

कपिलेश्वर रोड येथे राहणाऱ्या कपिल नावाच्या युवकाने एक स्वप्न बघितलं की इथेच माझं एक आलिशान हॉटेल असेल आणि त्या नंतर चालू झाला तो श्रमाचा प्रवास… प्रत्येक गोष्ट नेमकी, नेट नेटकी आणि चांगलीच झाली पाहिजे या देहाने प्रेरित झालेल्या कपिल भोसले यांचे यश हे केवळ दिवा स्वप्न नव्हते तर तो होता हिमालय ओलांडण्याचा दुर्दम्य आशावाद.

अत्यंत प्रतिकूल परिस्थिती साधनाचा अभाव आणि अनेक संकटांची मालिका या सगळ्याच्या विरुद्ध उभा होता तो कपिल…आपण काही तरी करायचंच हा मनोध्यास कपिल च्या इच्छा शक्तीला मनोबल आणत होता.

के एल  ई इंजिनियरिंग कॉलेज समोर 2006 सालीच्या काळात सुरू झालेली चायनीज विक्री करणारी गाडी त्यावर राबणारा तो कपिल भोसले आणि आज बेळगावच्या दक्षिण भागातील सर्वात मोठा तरुण हॉटेल व्यवसायिक ही गरुड भरारीची झेप ध्येय समोर ठेऊन काम करणाऱ्या युवकांनी आत्मसात करायला लावणारी आहे.

ज्यावेळी कष्टाला परिश्रमाची जोड मिळते त्यावेळी कपिल भोसले यांच्या सारखा हॉटेल व्यवसायात यश मिळवलेला युवक तयार होतो. एका छोट्याशा टपरीचा मोठ्या हॉटेल ग्रुप विराट वृक्षात मध्ये उद्घाटन झालेला आहे. विराट फूड कॉर्नर ही केवळ चवीची गोष्ट नाहीये तर श्रमाची देखील आहे अन् यशस्वीतेची बाब आहे.Satish hotel virat

20 वर्षांपूर्वी  के एल ई इंजिनिअरिंग कॉलेज समोर चायनीज गाडी उभा करतो हळूहळू त्याला यश मिळत जाते मेहनत रंग येते आणि त्या गाडीचं छोट्याशा हॉटेलमध्ये रुपांतर होतं. मेहनतीने हॉटेल देखील यशस्वीतेकडे वाटचाल करत एक नावाजलेला लौकिक मिळवलेला हॉटेल म्हणून समोर येते. पुन्हा प्रगती कडे वाटचाल करत विराट हॉटेल फिश सेक्शन वेगळे करते आणि आज एक मोठ्या हॉटेलसह विराट फूट कॉर्नर या सर्व प्रकारच्या जेवणाचा स्वाद मिळवणारा ठिकाण म्हणून रुजू होत आहे.Ganesh advt 2024

उद्यमबाग रोड, चौथ्या रेल्वे गेट जवळील ‘विराट फूड कॉर्नर’ या नूतन उपहारगृहाचा उद्घाटन समारंभ आज रविवार दि. 8 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे सदर उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम खाते आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह मराठा समाजाचे नेते रमाकांत कोंडुसकर आणि बेम्को हायड्रोलिक्स लि.चे वरिष्ठ व्यवस्थापक सतीश नाईक उपस्थित राहणार आहेत.

कपिल भोसले या युवकाची स्वप्नपूर्ती आज झालेली आहे आणि फूड कॉर्नरच्या निमित्ताने बेळगावच्या हॉटेल व्यवसायात एक नवा आयाम विराटने रचलेला आहे म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही.

प्रासंगिक…
उद्यमबाग रोड येथील ‘विराट फूड कॉर्नर’चे उद्घाटनGanesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.