बेळगाव लाईव्ह : हुबळी-बेळगाव-पुणे वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. बेळगाव आणि धारवाडमधील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून या संदर्भात दक्षिण पश्चिम रेल्वेने माहिती दिली आहे.
रेल्वे क्रमांक 20670 पुणे-SSS हुबळी त्रि-साप्ताहिक वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक 3 ऑक्टोबरपासून बेळगाव आणि धारवाड स्थानकांवर बदलण्यात आले आहे. वंदे भारत रेल्वे सध्या बेळगावला रात्री 8.35 वाजता येते आणि रात्री 8.40 वाजता सुटते. ती 3 ऑक्टोबरपासून रात्री 8.15 वाजता पोहोचेल आणि 8.20 वाजता निघेल. धारवाड स्थानकावर रात्री 10.20 वाजता येऊन रात्री 10.22 वाजता सुटणारी रेल्वे आता 3 ऑक्टोबरपासून रात्री 10.13 वाजता येऊन 10.15 वाजता प्रस्थान करेल.
एर्नाकुलम-यलहंका दरम्यान धावणारी (क्रमांक 06101/06102 ) विशेष रेल्वे सेवा रद्द करण्यात आली असून प्रवाशांच्या कमतरतेमुळे तीन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे दक्षिण रेल्वेने सांगितले आहे.
06101 हि एर्नाकुलम-यलहंका विशेष रेल्वे सेवा 25, 27 आणि 29 सप्टेंबर 2024 रोजी धावणार होती मात्र आता ती रद्द करण्यात आली आहे. तसेच 06102 हि एर्नाकुलम-यलहंका रेल्वे 26, 28 आणि 30 सप्टेंबर रोजी धावणार होती मात्र हि सेवादेखील रद्द करण्यात आली आहे.