बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील वंटमुरी गावाजवळील मार्कंडेय नदीपात्रात संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या लॉरी वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने लॉरी पुणे- बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या मार्कंडेय नदीपात्रात कोसळली.
पुणे – बेंगळुरू राष्टीय महामार्गालगत असलेल्या मार्कंडेय नदीत अतिवेगाने येणारी लॉरी कोसळली असून चालकाने प्रसंगावधान राखत लॉरीतून उडी घेऊन आपला जीव वाचविला.
सदर लॉरी संकेश्वरहून बेळगावच्या दिशेने येत होती. घटनेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या माध्यमातून लॉरी बाहेर काढली.
घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.या घटनेची नोंद काकती पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.




