बेळगाव लाईव्ह :मार्केट यार्ड, कंग्राळी खुर्द गावचे युवा कार्यकर्ते प्रशांत पाटील आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत काल सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
बेळगाव शहरातील गोवावेस जवळील मधुबन हॉटेल येथे बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी कंग्राळी खुर्दचे युवा कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी मित्र यल्लाप्पा पाटील, वैजनाथ बेन्नाळकर, महंतेश कोळूचे, यशोधन तुळसकर, राकेश पाटील, रोहित आणि विनायक यांचे पक्षाचा शेला घालून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.
पक्षप्रवेशाच्या या कार्यक्रमाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना शरद पवार यांनी पक्ष संघटना बळकट करण्याबाबत मार्गदर्शनपर विचार मांडले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष के. एस. इनामदार, ज्येष्ठ नेते प्रकाश हुक्केरी, रामभाऊ जाधव, पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष जोतिबा चव्हाण पाटील, सरचिटणीस दुर्गेश मेत्री, गौतम कांबळे, श्याम मंचुरी, अमोल देसाई, सदानंद सांबरेकर आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते.