बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातून लुप्त झाला की काय? इतकी शंका घेण्या इतपत दुर्मिळ झालेल्या ‘लेझीम’ या भारतीय खेळाला संजीवनी देऊन त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल विठ्ठल देव गल्ली शहापूर येथील सार्वजनिक श्री गणेशा मंडळ, व्यापारी मित्र मंडळाच्या महिला लेझीम पथकाचा श्रीराम इनोव्हेशन गणेशपुर रोड शाखेतर्फे आज गुरुवारी सत्कार करण्यात आला.
गणेशपुर रोड येथील श्रीराम इनोव्हेशनच्या कार्यालयामध्ये आयोजित या छोटेखानी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीराम इनोव्हेशनचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी विठ्ठल देव गल्ली शहापूर व्यापारी मित्र मंडळ महिला लेझीम पथकाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
सर्वसामान्यपणे लेझीम पथक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लेझीम खेळणारी मुले किंवा तरुण-तरुणी येतात परंतु उपरोक्त महिला लेझीम पथकाचे वैशिष्ट्य म्हणजे या पथकातील सर्व महिलांनी वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. हे देखील त्यांच्या सत्कार मागील एक प्रमुख कारण आहे.
यासंदर्भात बोलताना सुरेंद्र अनगोळकर म्हणाली की, विठ्ठल देव गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महिला विंगमध्ये 16 महिला आहेत. या सर्व 40 वर्षे वयोगटावरील महिलांनी एकवटून लेझीमचा उपक्रम हाती घेऊन यशस्वी केला ही खरंच कौतुकास्पद बाब आहे.
अलीकडच्या काळात आपल्या हिंदू संस्कृतीतील कांही कला लुप्त होत चालल्या आहेत. त्यापैकी एका कलेला पुनरुज्जीवन देण्याचे कार्य या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने केले आहे. त्यासाठी श्रीराम इनोव्हेशनच्या गणेशपुर रोड शाखेतर्फे आज आम्ही त्यांचा छोटेखानी सत्कार केला आहे असे सांगून तसेच भविष्यात त्यांच्या मंडळाला लेझीमसाठी तसेच इतर गरजेच्या वेळी मदत करण्यास आम्ही सदैव तत्पर राहू, असे आश्वासन अनगोळकर यांनी दिले.
विठ्ठल देव गल्ली, व्यापारी मित्र मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 33 वर्षापासून आमचे सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, व्यापारी मित्र मंडळ वेगवेगळे प्रकारे श्री गणेशोत्सव पारंपारिक पद्धतीने त्याचप्रमाणे युवाशक्ती आणि महिलाशक्तीला एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.
गेल्या पाच वर्षापासून आमच्या मंडळाच्या मंडपात आम्ही वेगवेगळे उपक्रम करत असतो महाप्रसाद सर्वजण करतात परंतु उत्कृष्ट दर्जेदार महाप्रसाद भाविकांपर्यंत पोहोचावा यासाठी आमचा प्रयत्न असतो यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम केला केला तो म्हणजे आमच्या समाजातील काही महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या ‘गीता परिवार’ होय.
या गीता परिवाराच्या माध्यमातून लहान मुलांवर उत्तम असे धार्मिक व शैक्षणिक संस्कार करून त्यांना मार्गदर्शन केले जाते. आता आमच्या महिलांनी लेझीम पथक स्थापन केला आहे. बेळगाव शहरात कांही मोजक्याच मंडळांनी लेझीम खेळाची जपणूक केली आहे अन्यथा हा खेळ बेळगावातून जवळपास लुप्त झाला होता. हे लक्षात घेऊन आम्ही लेझीम खेळाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी आमच्या महिला मंडळाने पुढाकार घेऊन लेझीम पथक स्थापन केले. आज या लेझीम पथकाची संपूर्ण बेळगाव चर्चा आहे.
आमच्या या उपक्रमाची दखल घेऊन सुरेंद्र अनगोळकर यांनी आम्हाला निमंत्रित करून आमचा येथे जो सत्कार केला ही आमच्या महिला मंडळासाठी गर्वाची बाब आहे त्याचबरोबर संपूर्ण बेळगाव आतील महिला व युवती या लेझीम खेळासाठी अग्रेसर होत असतील तर व्यापारी मित्र मंडळ विठ्ठल देव गल्ली शहापूर त्यांना होईल तितके सहकार्य करण्यास तयार आहे अशी ग्वाही