Tuesday, November 5, 2024

/

बेळगाव-गोवा व्यापाराला खराब रस्ते, छळवणूकीचा अडथळा

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :उत्पादित मालाची देवाणघेवाण आणि भाजीपाला दैनंदिन पुरवठा सुलभ करणाऱ्या बेळगाव आणि गोवा दरम्यानचा महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रस्त्यांची बिघडलेली परिस्थिती आणि अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या सततच्या छळवणुकीमुळे नुकसान होत आहे. अनमोड ते रामनगर हा 10 कि.मी.चा अपूर्ण रस्ता आणि जीर्ण झालेला चोर्ला घाट रस्ता हे या दोन भागातील मालवाहतूक सुरळीत होण्यास अडथळा निर्माण करणारे मोठे अडसर बनले आहेत.

अलीकडेच या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (बीसीसीआय) यांनी एकत्रित प्रयत्न करण्याकरिता चर्चा करण्यासाठी बेळगाव येथे द्विपक्षीय बैठक घेतली.

यावेळी बोलताना जीसीसीआयच्या रसद (लॉजिस्टिक कमिटी) समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गावस म्हणाले, “गोव्यातून कर्नाटक आणि कर्नाटकातून गोव्याकडे होणाऱ्या माल वाहतुकीवर वाईट परिणाम झाला आहे. बेळगाव स्थित कांही कंपन्यांनी रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे गोव्याच्या बंदरातून आयात माल आणणे बंद केले आहे. त्याऐवजी त्यांनी मंगळूर होऊन आयात माल आणण्याचा निर्णय घेतला आहे.

गोव्यातील मोपा विमानतळ प्रमुख रसद केंद्र (लॉजिस्टिक हब) बनण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे. दुसरीकडे बेळगाव एकाच वेळी आयटी पार्क आणि संरक्षण उत्पादन संकुल विकसित करत आहे. या सर्वांसाठी विश्वासार्ह रस्ते जोडणीची मागणी आहे. बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांनी या पायाभूत सुविधांमधील तफावत दूर करण्याच्या निकडीवर भर दिला असून मोपा ते बेळगाव दरम्यानचा रस्ता तिलारी घाटमार्गे रुंद करण्याच्या शक्यतेवरही त्यांनी चर्चा केली आहे.

आमदार पाटील यांनी पोलिसांकडून दिला जाणारा त्रास, छळवणुकीचा मुद्दाही अधोरेखित करून दर आठवड्याला 5,000 हून अधिक खाजगी वाहने गोव्यातून बेळगावमध्ये खरेदीसाठी येत असतात. त्याला फक्त वाहतूक अधिकाऱ्यांच्या अवाजवी तपासणीला सामोरे जावे लागते. तेंव्हा बेळगाव प्रशासनाने अशा प्रथा बंद कराव्यात, अशी विनंती केली आहे.

तसेच कर्नाटक-नोंदणीकृत वाहनांना देखील गोव्यात समान वागणूक दिली जाते याकडे लक्ष वेधले आणि जीसीसीआयने या समस्येचे निवारण करण्यासाठी गोव्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, अशी विनंती   दक्षिण आमदारांनी केली. याव्यतिरिक्त बेळगाव ते गोव्यात भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकना गोव्याच्या अधिकाऱ्यांच्या छळाचा सामना करावा लागतो. ज्यामुळे दोन्ही प्रदेशांमधील व्यापाराची गतिशीलता आणखी गुंतागुंतीची होत आहे. ही आव्हाने कमी करण्यासाठी आणि बेळगाव आणि गोवा यांच्यातील व्यापाराचा ओघ सुधारण्याकरीता उपाय शोधण्यासाठी जीसीसीआय आणि बीसीसीआय या चेंबर्सनी एकत्र काम करण्याचे मान्य केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.