Wednesday, December 25, 2024

/

टोळक्याने धुडगूस घालत घरावर केली दगडफेक

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :वीस जणांच्या मध्यधुंद टोळक्याने धुडगूस घालत घरावर तुफान दगडफेक केली. रविवार (दि.१८) रात्री दहाच्या सुमारास येळेबैल येथे ही घटना घडली असून घरातील सदस्यांना देखील मारहाण करण्यात आली.

दगडफेकीत घरचे पत्रे दरवाजा आणि खिडक्यांची तावदाने तुटली आहेत. बाहेरून आलेल्या टोळक्याने अचानक घरावर चाल करत दगडफेक केल्याने गावात तणावाची वातावर निर्माण झाले.

परशराम रामू पाटील आणि रघुनाथ रामू पाटील (रा. येळेबैल) यांच्या घरावर टोळक्याने दगडफेक करत तोडफोड केली आहे. गावातील १५ गुंठे जमिनीवरून पाटील आणि अन्य काही जणांमध्ये वाद सुरू आहे.

हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट असून न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र आज दुपारी पन्नास जणांचे टोळके पाटील यांच्या घराकडे आले. घरासमोर थांबून आरडाओरड करण्यासह अश्लील शब्दात शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच घरात घुसून सदस्यांना मारहाण करण्यास धमकावण्यात आले. त्यानंतर माघारी फिरलेले टोळके पुन्हा रात्री दहाच्या सुमारास मध्यधुंद अवस्थेत परतले.Yalebail

त्यांनी घरावर तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दगडफेकीत घराजा दरवाजा, खिडक्यांची तावदाने व पत्रे फुटले. घरासमोर पार्क करण्यात आलेल्या मोटरसायकलीची देखील तोडफोड करण्यात आली. घरावर हल्ला झाल्याने गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्यामुळे काही वेळानंतर टोळक्याने तेथून पलायन केले. घडलेल्या या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीनी ही माहिती बेळगाव ग्रामीण पोलिसांना दिली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलीस घटना सही दाखल झाले नव्हते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.