बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील नावगे गावाजवळ असलेल्या स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना कारखाना १८ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
आगीत मृत्युमुखी पडलेल्या यल्लाप्पा गोंड्यागोळ याच्या वडिलांच्या आणि आईच्या नावे कारखान्याने प्रत्येकी नऊ लाख रुपयांचा धनादेश जारी केला आहे.
मयत मजुराच्या कुटुंबीयांना उद्या धनादेश देण्यात येणार असल्याचे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन दिवसापूर्वी नाव घे क्रॉस येथील स्नेहम इंटरनॅशनल या चिकटपट्टी टेप तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत यल्लाप्पा गोंड्यागोळ या कामगाराचा मृत्यू झाला होता याशिवाय कारखाना देखील आगीत जळून खाक झाला होता.
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी देखील या जळलेल्या कारखान्याची पाहणी केली होती दरम्यान अनेक संघटनांकडून मयत युवकाच्या वारसांना शासनाकडून मदत देण्याची मागणी होऊ लागली होती.
कारखान्याला आग लागून कोट्यावधींचे नुकसान झालं असतं तर असले तरी कारखान्याच्या मालकाने कामगारांचा एक महिन्याचा पगार दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याशिवाय जिल्हाधिकारी मोहम्मद रेशन यांच्या मध्यस्थीतून 18 लाख रुपये नुकसान भरपाई मदत मयताच्या वारसांना देण्यात आली आहे.