Sunday, September 15, 2024

/

फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी स्पर्धेत चमकला आयुष शहापूरकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मूळचा बेळगावचा रहिवासी असलेला सेंट पॉल हायस्कूल कॅम्पचा माजी विद्यार्थी आयुष आर. शहापूरकर याने व्हीट वेल्लोर मधील टीम ओजस रेसिंगसाठी व्यवसाय योजना सादरीकरणाचे नेतृत्व केले. तो एरोडायनॅमिक्स आणि कंपोझिट संघाचा सदस्य व संघाने तयार केलेल्या कारचा चालक देखील होता.

टीम ओजस रेसिंगने गेल्या 12 ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी स्पर्धेत पात्र ठरलेल्या आणि स्पर्धा करणाऱ्या दोन भारतीय संघांपैकी एक बनून इतिहास घडवला.

ईव्ही प्रकारात स्पर्धा करत त्यांनी त्यांची कार वेल्लोर, तामिळनाडू येथून हॉकेनहाइम, जर्मनी येथील हॉकेनहाइमरिंग येथे यशस्वीरित्या पाठवली. फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी ही स्पर्धा दोन श्रेणीत घेण्यात आली.Car formula

डायनॅमिक्स ज्यामध्ये सहनशक्ती, प्रवेग, ऑटोक्रॉस, स्किडपॅड आणि स्टॅटिक इव्हेंट्स जसे की बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन, कॉस्ट व मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग डिझाइन रिपोर्ट यांचा समावेश होता.

फॉर्म्युला स्टुडंट जर्मनी स्पर्धेत 20 वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 53 संघांमध्ये तीव्र चूरस असूनही टीम ओजस रेसिंगने उत्कृष्ट कामगिरी केली. या टीमला बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशनमध्ये प्रभावी 26 वे स्थान मिळवले. टीम ओजस रेसिंगच्या या यशात आयुष आर. शहापूरकर याचे नेतृत्व आणि योगदान मोलाचे ठरले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.