Wednesday, December 25, 2024

/

‘त्या’ दुर्दैवी महिलांच्या कुटुंबीयांचे डॉ. सरनोबत यांनी केले सांत्वन

 belgaum

बेळगाव लाईव्ह: विजेचा धक्का लागून नुकत्याच मृत्युमुखी पडलेल्या सुळेभावी गावातील दोन महिलांच्या कुटुंबीयांची कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सुळेभावी येथील कलावती मारुती बिदरवाडी आणि सविता फकिराप्पा वटी या दोन महिला गावातील महिलांची मंदिरात बैठक झाल्यानंतर मंदिराचे लोखंडी शटर बंद करत होत्या.

त्यावेळी मुसळधार पावसामुळे शॉर्ट झालेल्या वायर मधील वीज शटरमध्ये प्रवाहित झाली होती. मात्र दुर्दैवाने त्याची कल्पना नसल्यामुळे शटर बंद करणाऱ्या दोन्ही महिलांना आपला जीव गमवावा लागला. कौटुंबिक परिस्थिती बेताची असलेल्या मयत महिलांना प्रत्येकी चार मुले आहेत.Sonali

सदर दुर्घटनेची माहिती मिळताच कर्नाटक भाजपा महिला मोर्चाच्या राज्य सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी नुकतीच मयत महिलांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

तसेच त्यांचे सांत्वन करण्याबरोबरच त्यांना शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी भाग्यश्री कोकितकर, स्नेहल कोळेकर, चेतना अगसेकर आदींसह स्थानिक भाजप कार्यकर्ते आणि गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.