Thursday, October 31, 2024

/

मार्केट पोलीस स्टेशन मधील ‘त्या’ गुन्ह्यातील आरोपपत्र मागे

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अवमान प्रकरणाचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन छेडलेल्या शिवप्रेमी कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

मार्केट पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतील ४० जणांची नावे वगळण्यात आली असून गुन्ह्यातील ४० जणांवरील आरोपपत्र मागे घेण्यात आले आहे.

धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केल्याप्रकरणी राज्यद्रोह व अन्य कलमांखाली गुन्हे दाखल असलेल्या ५५ पैकी ४० जणांना या खटल्यातून वगळण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना केल्याच्या निषेधार्थ बेळगावातील शिवप्रेमींनी २०१९ मध्ये धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले होते. याप्रकरणी मार्केट पोलिसांनी ५५ जणांविरोधात राज्यद्रोह व इतर प्रकारचे खटले दाखल केले होते. मात्र, हे गुन्हे खोटे असून संबंधितांना या खटल्यातून संशयितांना वगळण्याची मागणी ऍड. राम घोरपडे आणि ऍड. पल्लवी पालेकर यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात एका याचिकेद्वारे केली होती. त्याचा विचार करुन न्यायालयाने ४० जणांना या खटल्यातून वगळले आहे.

यामध्ये बळवंत रामा शिंदोळकर, नरेश राजू निलजकर, मेघराज रवळनाथ गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील प्रकाश लोहार, नागेश हणमंत काशिलकर, रोहित महादेव माळवी, शुभम विजय सुतार. शुभम राहुल बांदेडकर,. सागर बंडू केरवाडकर, विनायक संजय सुतार, श्रेयस उर्फ सोनू उर्फ श्री सुहास खटावकर, गजानन ज्योतिबा जाधव, विनायक उर्फ मायाप्पा परशुराम कोकितकर, दयानंद दत्ता बडसकर, सूरज सुभाष गायकवाड, राहुल मदन बराले, गौरव उर्फ गौरांग जगन्नाथ गेंजी, रत्नप्रसाद लक्ष्मण पवार, सरिता विराज पाटील, लोकेश उर्फ लोकनाथ जयशिंग राजपूत, सुदेश परशुराम लाटे , राहुल रमेश सावंत, सिद्दू उर्फ श्रीधर, दिलीप गेंजी, विक्की प्रकाश मंडोळकर, सूरज रामा शिंदोळकर, भालचंद्र दत्त बडस्कर, विनायक रवींद्र हुलजी, हरीश प्रेमकुमार मुतगेकर, भरत लक्ष्मण मेस्सी, बागेश बाळाराम नंद्याळकर, हृतिक तानाजी पाटील, राजेंद्र गौतम बैलूर, विश्वनाथ रवी घोटाडकी अशा ४० जणांवरील आरोप पत्र मागे घेण्यात आले आहे.

या खटल्यात ऍड. राम घोरपडे आणि पल्लवी पालेकर यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.