Thursday, November 7, 2024

/

दैवज्ञ सहकारी बँकेचा 24 रोजी सुवर्ण महोत्सव – चेअरमन भट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सहकार क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या दैवज्ञ सहकार बँकेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा येत्या शनिवार दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता मराठा मंदिर येथे आयोजित केला असून सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संस्थेचे चेअरमन उदय शंकर भट आणि व्हाईस चेअरमन मंजुनाथ शेट यांनी दिली.

शहरामध्ये आज मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ 75 रुपये भाग भांडवल जमा करून सुरेश गोविंद पावसकर, रमाकांत कृष्णा अणवेकर, श्रीपाद गणेश रेवणकर व हिराचंद विनायक रायकर या चौघांनी 1969 साली दैवज्ञ साप्ताहिक फंडाची स्थापना केली.

कालांतराने फंडाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी 1974 मध्ये सदर फंडाचे दैवज्ञ को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून नोंदणी करण्यात आली पुढे 1997 मध्ये या सोसायटीला रिझर्व बँकेने दैवज्ञ सहकारी बँक म्हणून मान्यता दिली प्रारंभी अवघ्या 75 रुपयांच्या भागभांडवलावर सुरू करण्यात आलेल्या या संस्थेकडे आज 270 कोटी रुपयांचे भागभांडवल आहे.Daivagnya bank

ग्राहकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देऊन बँकेने आपला ठसा उमटविला आहे. आर्थिक प्रगतीमुळे आता ही बँक दैवज्ञ समाजाच्या बरोबरीने इतर विविध समाजांसाठी देखील अर्थसहाय्य देणारी एक भक्कम आधारस्तंभ बनली आहे. संपूर्ण देशात दैवज्ञ समाजाची ही एकमेव बँक आहे हे विशेष होय. या बँकेची प्रगती पाहून कर्नाटक सरकार आणि सहकार खात्याकडून 2014 मध्ये दैवज्ञ सहकारी बँकेला ‘उत्कृष्ट बँक’ हा पुरस्कारही मिळाला आहे.

दैवज्ञ सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि सन्माननीय अतिथी म्हणून आमदार अभय पाटील, सहकार खात्याचे संयुक्त निबंधक डॉ. सुरेश गौडा, दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याच्या निमित्ताने दैवज्ञ सहकारी बँकेच्या आजी-माजी संचालकांचा सत्कार समारंभही होणार आहे. तसेच एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

दैवज्ञ सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात जीवन वेर्णेकर, श्रीमती कल्पना अणवेकर समीर अणवेकर, जीवन डी .वेर्णेकर , माणिक अणवेकर, गणेश वेर्णेकर श्रीमती वनिता शेठ, मंजुनाथ शेठ, राजेश अणवेकर,  यांचा समावेश आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. याप्रसंगी सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेश अणवेकर, सदानंद रेवणकर आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.