बेळगाव लाईव्ह : गेल्या काही महिन्यांपासून माळी गल्ली, आझाद गल्ली, कामत गल्ली, दर्गा गल्ली परिसरातील ड्रेनेजची समस्यां गंभीर बनली आहे. याचप्रमाणे दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नगरसेविका ज्योती कडोलकर यांना बोलावून घेऊन या समस्यांची सम्पुर्ण माहिती देण्यात आली.
यामुळे निधीच्या कमतरतेमुळे समस्यां निर्माण झाल्या आहेत, निधी उपलब्ध करून घेण्यात येईल, तसेच या प्रभागातील समस्या लवकरच सोडविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.
एल अँड टी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या भागात अशा समस्याच उद्भवत असून येथील समस्या निवारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी पालिका अधिकारी, एल. अँड टी कंपनीचे अधिकारी यांना सोबत घेऊनच पाहणी करण्यात आली. यावेळी स्थानिकांनी नगरसेविकांसह अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.