बेळगाव लाईव्ह: श्रावण सोमवार सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कटिंग करून घेण्यासाठी दुचाकी वरून जाणारे दोन युवक नाल्यात कोसळले या घटनेत एक युवक बचावला असून एक जण वाहून गेला असून बेपत्ता आहे. शनिवारी सायंकाळी 7 : 30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
अलतगा गावाहून कंग्राळी खुर्द कडे दुचाकीवरून जाणाऱ्या गाडीचा तोल गेल्याने दुचाकीसह अलतगा येथील शेरी नाल्यात कोसळली त्या घटनेत एक युवक बचावला असून एक जण बेपत्ता आहे त्याचा शोध घेतला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार ओमकार पाटील वय 24 आणि ज्योतीनाथ पाटील वय 25 अशी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघा युवकांची नावे आहेत. या घटनेत ज्योतीनाथ पाटील हा बचावला असून ओमकार पाटील हा बेपत्ता आहे.
घटनास्थळी काकती पोलीस एन. डी.आर.एफची दाखल झाले असून नाल्यात बेपत्ता झालेल्या युवकाचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दोघे युवक सायंकाळी साडे सातच्या दरम्यान कंग्राळी खुर्द येथे कटिंग करून घेण्यासाठी जात होते त्यावेळी दुचाकीचा बॅलन्स गेल्याने दुचाकी सह दोघेही शेरी नाल्यात कोसळले.
ज्योतीनाथ हा कोसळलेल्या नाल्यात झुडपाला पकडून बाजूला आला मात्र ओमकार हा नाल्यात प्रवाहासह वाहून गेला. शेतवाडीत जमणार पाणी या नाल्याद्वारे मार्कंडेय नदीला जाऊन मिळते त्यामुळे हा युवक वाहून मार्कंडेय नदीत गेला असावा का ? असा संशय व्यक्त करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.