Monday, July 15, 2024

/

चोर्ला घाटातील अपघातात बेळगावचा युवक ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह: कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर कार आदळल्याने,झालेल्या अपघातात बेळगावचा युवक ठार झाला आहे.

बेळगाव गोवा रोडवर चोर्ला घाटात माड्यानी येथे हा अपघात घडला आहे. संकेत बबन लोहार (वय 27) गांधीनगर बेळगाव या अपघातात मयत पावलेल्या युवकाचे नाव आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, बेळगाव येथील चार युवक आपल्या कार गाडीने गोव्याकडे जास्त असताना, चोर्ला घाटात साखळी (गोवा) नजीक, माड्यानी येथे चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून, कार झाडाला आढळल्याने चालकाच्या बाजूला बसलेला युवक संकेत बबन लोहार हा जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.Sanket lohar

सदर युवक हा श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव महानगरचा कार्यकर्ता आहे . सदर घटनेने श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेवर शोककळा पसरली आहे.

सदर अपघाताची नोंद गोवा पोलीसात झाली असून, सदर युवकावर बेळगाव येथे  रविवारी  सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.