बेळगाव लाईव्ह:कर्नाटक औषधोपचार सेवा कर्मचाऱ्यांविरुद्धचा हिंसाचार आणि औषधोपचार संस्थांमधील मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा 2009. आरोग्यसेवा व्यावसायिकांची सुरक्षा आणि सन्मान वाढवण्यासाठी कर्नाटक सरकारने कर्नाटक वैद्यकीय नोंदणी आणि कांही इतर कायदा (सुधारणा) विधेयक 2024 अंमलात आणले आहे.
डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थ्यी आणि रुग्णसेवा (पॅरामेडिकल) कर्मचाऱ्यांच्या हेतुपुरस्सर केलेल्या अपमानांना संबोधित करणे आणि त्यांना दंड करणे हे या विधान उपायाचे उद्दिष्ट आहे.
हे विधेयक थेट किंवा सोशल मीडिया आणि अनधिकृत रेकॉर्डिंगद्वारे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा अपमान करणे, मानहानी करणे किंवा त्यांना शिवीगाळ करणे. यासाठी शब्द, हावभाव किंवा डिजिटल सामग्री वापरणे म्हणजे “हेतूपूर्वक अपमान” म्हणून परिभाषित करते.
कर्नाटक वैद्यकीय नोंदणी आणि कांही इतर कायदा (सुधारणा) विधेयक 2024 नुसार हेतुपुरस्सर अपमान म्हणजे “औषधोपचार (मेडिकेअर) सेवेच्या कर्मचाऱ्यांना त्याच्या व्यावसायिक कर्तव्याच्या संदर्भात थेट संबोधित करून अथवा सोशल मीडियाद्वारे किंवा अनधिकृत ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग व फोटोग्राफीद्वारे शब्द, आकृती किंवा हावभाव वापरून त्यांचा अपमान करणे, मानहानी करणे, चिडवणे किंवा शिवीगाळ करणे होय.”
या विधेयकानुसार अशा गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्यांना 3 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. विधेयकाच्या कलम 3, 3ए आणि 4ए अंतर्गत गुन्ह्यांचे वर्गीकरण दखलपात्र आणि अजामीनपात्र म्हणून केले जाते, उपायांच्या तीव्रतेवर जोर दिला जातो. हा उपक्रम आरोग्यसेवेच्या अग्रभागी असलेल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आदरयुक्त आणि सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
“औषधोपचार सेवा संस्थेशी संबंधित वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांमध्ये” यांचा समावेश असेल -1) नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, मेडिकेअर संस्थांमध्ये काम करणारे (तात्पुरती नोंदणी असलेल्यांसह), 2) नोंदणीकृत परिचारिका, 3) वैद्यकीय विद्यार्थी, 4) नर्सिंग विद्यार्थी, 5) वैद्यकीय सेवा संस्थांमध्ये नियुक्त केलेले आणि काम करणारे रुग्णसेवा कर्मचारी.