बेळगाव लाईव्ह :येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसह शहर परिसरातील तलावांची साफसफाई आणि इंदिरा कॅन्टीन्सची दुरुस्ती या कामांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
जारी करण्यात आलेल्या निविदा पुढीलप्रमाणे आहेत. बेळगाव दक्षिण मतदारसंघातील यरमाळ तलावाचे पुनरुज्जीवन आणि विकास, मूल्य – 75,00,000/-. रस्त्यावरील खड्डे भरणे : बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील उत्तर उपविभाग -2 हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवणे –4500000. बेळगाव महापालिका कार्यक्षेत्रातील दक्षिण उपविभाग 02 हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवणे -45,00,000. दक्षिण उप विभाग -2 क्षेत्र, बेळगाव येथील गणेश मिरवणूक पूर्वसंध्येला मिरवणूक मार्गावरील खड्डे भरणे -2000000.
गणेशोत्सवासाठी तलाव रंगरंगोटी : गणेशोत्सवापूर्वी आवार भिंतीची उभारणी आणि डिवॉटरिंग, डी-सिल्टिंग आणि रंगकाम, तसेच नवीन कपिलेश्वर तलाव बेळगाव येथे गणेशोत्सवानंतर डिवॉटरिंग, डी-सिल्टिंग आणि साफसफाई –1500000. गणेशोत्सवापूर्वी डिवॉटरिंग, डी-सिल्टिंग, फ्लश पॉइंटिंग, रबरी दगडी बांधकाम (रबर स्टोन मॅसोनरी) आणि रंगकाम. त्याचप्रमाणे जक्केरीहोंडा, बेळगाव येथे गणेशोत्सवानंतर डिवॉटरिंग, डी-सिल्टिंग आणि साफसफाई –800000. शहरातील किल्ला येथील विसर्जन तलावाचे रंगकाम, निर्जलीकरण आणि गाळ काढणे –250000. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अनगोळ प्रभाग क्र. 57 मधील लाल तलाव येथे पांढऱ्या धुण्याचे ग्रिट फ्लशिंग डी-सायलिंग उपलब्ध करणे –480000. बेळगावातील कणबर्गी येथील विसर्जन तलावात रंगविणे, निर्जलीकरण करणे आणि गाळ काढणे –20000. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 41 व 56 येथील कलमेश्वर तलाव आणि वडगाव नाझर कॅम्प येथील विसर्जन तलावांची गाळ काढून स्वच्छता करणे (ग्रिट फ्लशिंग आणि डी-सिल्टिंग) –475000.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरणे : गणेश मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उत्तर उपविभाग-1 परिसरातील मिरवणूक मार्गावरील खड्डे भरणे -30,00,000. उत्तर उपविभाग-2 बेळगाव येथील गणेश मिरवणूक मार्गावर पेव्हर, डब्लूएमएम आणि मुरूम टाकून खड्डे भरणे – 20,00,000.02. महापालिकेच्या उत्तर उपविभाग-1 हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवणे –4500000. प्रभाग क्र.36 बेळगाव मधील पार्वतीनगर येथील ॲप्रोच रोडची सुधारणा -1500000.
उत्तर उपविभाग-2 क्षेत्र महापालिका बेळगाव हद्दीत भुयारी गटारीची (युजीडी) वार्षिक देखभाल -5000000. उत्तर उपविभाग -1 क्षेत्र महापालिका बेळगाव हद्दीतील भुयारी गटारीची (युजीडी) वार्षिक देखभाल -5000000. प्रभाग क्र. 39, बेळगाव येथील लक्ष्मी गल्ली 4 था क्रॉस आणि शिवाजी गल्ली रस्त्याची सुधारणा -2400000. दक्षिण उपविभाग – 2 क्षेत्र बेळगाव मधील युजीडी पाईपलाइन आणि चेंबर्सची दुरुस्ती व देखभाल –5000000. महापालिकेच्या दक्षिण उपविभाग-1 मध्ये युजीडीची वार्षिक देखभाल –5000000.
इंदिरा कॅन्टीन : नाथ पै सर्कल शहापूर बेळगाव येथील इंदिरा कॅन्टीनमध्ये सुधारणा –500000. गोवावेस महापालिका व्यापारी संकुल परिसर, बेळगाव येथील इंदिरा कॅन्टीनमध्ये सुधारणा -500000. आझमनगर, बेळगाव येथील इंदिरा कॅन्टीनची दुरुस्ती -500000. केएमएफ डेअरी परिसर महांतेशनगर बेळगाव येथील इंदिरा कँटीनमध्ये सुधारणा -500000. केएसआरटीसी बस स्टँड बेळगाव येथील इंदिरा कँटीनमध्ये सुधारणा -500000. बेळगाव रुग्णालयातील इंदिरा कॅन्टीनमध्ये सुधारणा -500000.