Friday, September 20, 2024

/

शहापूर, अनगोळ शिवारातील टीसी ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर शिवारातील जमीनदोस्त तर अनगोळ शिवारातील बष्ट झालेला विद्युत ट्रान्सफॉर्मर (टीसी) यांची हेस्कॉमने ताबडतोब युद्धपातळीवर दुरुस्ती करून ते पूर्ववत सुरू करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विद्यूत खात्याने शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी जिथे कुपनलीका आहेत तिथे विज पोहोचवली. त्यासाठी टिसीची व्यवस्था केली. मात्र हे टीसी संरक्षित रहावेत यासाठी योग्य नियोजन नसल्याने त्याचा त्रास व भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

टिसी उभारताना आधी जमीनीचा अभ्यास करून भरती घालून नंतरच खांब उभारुन ते चांगल्याप्रकारे शाश्वत उभारले पाहिजेत. तथापी विद्यूत खाते असे न करता घिसाडघाईने आपल्या मनाला येईल तसे टीसी उभारून शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठ्याची व्यवस्था करत आहेत. परिणामी चार-पाच वर्षातच टिसी बसवलेले खांब पावसाळ्यात आपोआप जमीनदोस्त होतात.

अशा कोसळलेल्या अथवा तशा स्थितीत असलेल्या विद्युत भारित टीसीमुळे शेतकऱ्यांच्या तसेच पावसाळ्यात भांगलण करण्यास गेलेल्या महिलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

अशीच परिस्थिती आताच्या पावसाळ्यात शहापूर शिवारातील एक टिसी जमीनदोस्त झाल्याने निर्माण झाली होती. मात्र शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखून ताबडतोब संबधीत लाईनमन व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीजपुरवठा बंद करण्यास सांगितल्यामुळे अनर्थ टळला.Farmer agri

दुसरीकडे अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शिवारातील टिसी मागच्या चार दिवसापूर्वी अचानक बष्ट झाल्याने त्यातील सर्व ऑईल जमीनीवर पडले. हि गोष्ट परिसरातील शेतकऱ्यांना समजताच त्यांनी संबधीत अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथील वीज पुरवठा बंद करायला लावला. आता मोठी अडचण ही आहे कि गेल्यावर्षी सारखी यावर्षी जर याच महिन्याच्या शेवटी पावसाने दडी मारली किंवा भात लावणी करायची असेल तर पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी शेतकरी सदर दोन्ही टिसी बदलून, खांब उभा करायचे म्हंटल्यास पीकांची नासाडी होणार आहे.

शेतकरी आधीच गांजलेला त्यात हि अडचण म्हणजे दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती आहे. मागच्यावेळी बाळेकुंद्री यांच्या शेतातील टिसी काढून येळ्ळूर, शहापूर सीमेवर रस्त्याच्या बाजूला उभारल्यास विद्यूत कर्मचारी व रिपेरी करायला सोपे जाईल तसेच लोंबकळणाऱ्या वाहिन्याही नवीन घालून धोका कमी करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी मागे विद्यूत अधिकाऱ्यांच्या बैठकित केली होती. मात्र तेव्हां फक्त आश्वासनं देण्यापलीकडे कोणतेच काम झाले नसल्याने आता शेतकऱ्यांना पाण्यासाठी अत्यंत अडचण होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी संबधीत हेस्कॉमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या दोन्ही शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ताबडतोड पावलं उचलून दोन्ही टिसी लवकरात लवकर सुरु करण्याची व्यवस्था करावी, अन्यथा शेतकरी हेस्कॉम कार्यालयावर धडक दिल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.