Sunday, December 1, 2024

/

येळ्ळूर ग्रामपंचायतीने केली पालकमंत्र्यांकडे मोठी मागणी मोठी मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याचे लवकरात लवकर रुंदीकरण करून नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे येळ्ळूर (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्यावतीने उपाध्यक्ष आणि सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांना सादर करण्यात आले. गेल्या सुमारे 10 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्याची अलीकडे पार दुर्दशा झाली आहे.

सध्याच्या पावसाच्या मोसमात वाताहत झालेल्या या रस्त्यावरून ये-जा करताना लोकांना मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सदर रस्ता हा सुळगे येळूर राजहंस गड नंदीहळी देसुर खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी वगैरे गावांना जोडणारा असल्यामुळे या रस्त्यावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहनांची सततची रहदारी असते.

वाळू विटांची वाहतूक करणारे ट्रक आणि डंपर सारखी अवजड वाहने देखील या रस्त्यावर कायम ये -जा करत असतात. परिणामी या रस्त्याची सध्या खचून व खड्डे पडून पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी दररोज एखाद दुसरा अपघात घडणे अथवा वाहने नादुरुस्त होणे हे नित्याचे झाले आहे. आजपर्यंत सदर रस्त्यावर घडलेल्या अपघातांमध्ये अनेकांचा मृत्यू होण्याबरोबरच बऱ्याच जणांना अपंगत्व आले आहे.Yellur road

अलीकडच्या काळात वाहनांची संख्या देखील वाढली असल्यामुळे सदर रस्त्याचे रुंदीकरण करावे, जेणेकरून हा रस्ता दुपदरी होईल आणि वाहतुकीची कोंडी न होता वाहने देखील सुरळीत ये -जा करतील. या खेरीज सकाळच्या वेळी वडगाव व येळ्ळूर येथील ज्येष्ठ नागरिक सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करत असतात. तेंव्हा रस्त्याच्या दुतर्फा पदपथ देखील तयार करण्यात यावा. आमच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सदर रस्त्याच्या नूतनीकरणाचा आदेश द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. सदर निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही सादर करण्यात आली आहे.

निवेदन सादर केल्यानंतर लाईव्हशी बोलताना बोलताना सतीश बा. पाटील यांनी सांगितले की, आम्ही येळ्ळूर ग्रामपंचायतच्यावतीने ग्रा.पं. उपाध्यक्ष व सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन त्यांना येळ्ळूर गावापासून बेळगाव शहरातील वडगावपर्यंतच्या रस्त्या संदर्भात निवेदन सादर केले आहे. येळ्ळूर गावापासून वडगाव पर्यंतचा रस्ता खचून खराब झाला आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी केलेल्या या रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

या रस्त्यावर नंदीहळ्ळी, देसूर, राजहंसगड, खानापूर तालुक्यातील गुंजी वगैरे गावांकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे रस्त्याची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची रुंदी वाढवून त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली आहे. मंत्र्यांनी निवेदनाचा स्वीकार करून सदर रस्त्याचे विकास काम लवकरात लवकर करून तुमची समस्या दूर करू असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती सतीश पाटील यांनी दिली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूस्कर, एस. व्ही. नांदुरकर, एम. एम. घाडी, पी. एल. परीट, सोनाली येळ्ळूरकर आदींसह येळ्ळूर ग्रामपंचायतीचे अन्य सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.