बेळगाव लाईव्ह : अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यासह विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात यावे अंमली पदार्थापासून तरुणांची रक्षा आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामाबात जागृती कार्यक्रम हाती घेण्यात यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित विविध खात्यांच्या जिल्हास्तरीय समन्वय समिती सभेच्या अध्यक्षनावरून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोलत होते.
अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांच्या सुधारणेसाठी सरकारी किंवा खाजगी पुनर्वस्ती केंद्रांची स्थापना करण्याची सूचना आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या औषध दुकानांवर नजर ठेवण्यात यावी, शाळा महाविद्यालय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी जागृती करण्याचे काम हाती घ्यावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील निवासी शाळा आणि उद्यानामधे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थ आणि त्याच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल विशेष जागृती मोहीम हाती घेण्यात यावी. अशी सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी केली. पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी देखील शाळा महाविद्यालयामध्ये अमली पदार्थ बाबत जनजागृती केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद म्हणाले, बंगळुरातील सरकारी रुग्णालयात अमली पदार्थांची सेवन करणाऱ्यांचा तपास करण्याची व्यवस्था आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील व्यवस्था केली पाहिजे असे सांगितले. सर्व शाळांना भेट देऊन अंमली पदार्थ आणि त्याच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामबाबत पोलिसांनी जागृती करावी अशी सूचना त्यांनी केली.
महामार्गावर वाहन चालकांना अगदी सहजरीत्या अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. त्यामुळे संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करण्यात यावी. ग्रामीण भागात गांजाचे पीक घेणाऱ्या अनेक शहरात विक्री करणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी लक्ष ठेवण्यात यावे अशी सूचनाही त्यांनी केली.