Saturday, December 28, 2024

/

धाब्यावरील नूडल्समध्ये आढळला चक्क झुरळ!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हायवे अर्थात राष्ट्रीय महामार्गावरील धाब्यांमध्ये जेवण अथवा फास्ट फूडची ऑर्डर देताना ग्राहकांना आता दहा वेळा विचार करावा लागणार आहे. कारण अशाच एका धाब्यावर सर्व्ह करण्यात आलेल्या नूडल्समध्ये चक्क झुरळ आढळून येण्याचा किळसवाना प्रसंग घडला आहे.

ही घटना घडली आहे पुना -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील संकेश्वर जवळील ‘हॉटेल साई पार्क, प्युअर व्हेज’ या धाब्याच्या ठिकाणी. याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगावचे निलेश मुतकेकर हे सहकुटुंब एका खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबईला निघाले होते.

जेवणासाठी गाडी संकेश्वर जवळील हॉटेल साई पार्क या अस्सल शाकाहारी धाब्याच्या ठिकाणी थांबली. तेथे मुतकेकर यांनी शाकाहारी जेवण टाळून सर्वांसाठी नूडल्सची ऑर्डर दिली. मात्र वेटरने आणून दिलेल्या नूडल्समध्ये चक्क झुरळ आढळून येताच मुतकेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.

सदर बाब मुतकेकर यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून दिली. तथापि सदर प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्याऐवजी व्यवस्थापकाने झुरळ चुकुन आला असणार असे सांगत सारवासारवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. तेंव्हा संतप्त मुतकेकर यांनी हॉटेल साई पार्क येथे जेवणास जाणाऱ्यांना सावध करण्यासाठी सोशल मीडियावर नूडल्समध्ये झुरळ आढळलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.Noodles cockroch

नूडल्समध्ये झुरळ आढळण्याच्या या कळसवाण्या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स किंवा धाब्यांमध्ये खाद्यपदार्थ खाणे किंवा जेवण करणे कितपत सुरक्षित आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बेळगाव जिल्हा खाद्य  सुरक्षा खात्याने अशा प्रकारावर अळ्या घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.