Tuesday, January 14, 2025

/

बेळगुंदी जवळील मल्टी स्पोर्ट्स स्टेडियमसाठी जागेची पाहणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावाजवळ लवकरच अत्याधुनिक मल्टी स्पोर्ट्स स्टेडियमची उभारणी केली जाणारा असून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी  स्टेडियमची जागा निश्चित करण्यासाठी पाहणी दौरा केला.

बेळगुंदी (ता. जि. बेळगाव) गावाच्या हद्दीत हायटेक मल्टी स्पोर्ट्स स्टेडियम उभारले जाणार आहे. या स्टेडियमसाठी सुचवण्यात आलेल्या जागांची आज रविवारी सकाळी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी पाहणी केली.

बेळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील या पद्धतीचे विविध खेळांसाठीचे हे पहिलेच अत्याधुनिक क्रीडांगण असणार आहे. क्रिकेट, कुस्ती, पोहणे, कबड्डी, व्हॉलीबॉल वगैरे विविध खेळांमध्ये बेळगाव तालुक्यातून राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जेदार क्रीडापटू निर्माण व्हावेत हा हे स्टेडियम उभारण्या मागचा मुख्य उद्देश आहे.

स्टेडियममध्ये अत्याधुनिक प्रकाशयोजना उभारण्यात येणार असून ज्याद्वारे स्टेडियमचा दिवस आणि रात्र वापर करता येईल. आजच्या पाहणी दौऱ्यानंतर स्टेडियमसाठी योग्य अशी जागा निश्चित केली जाणार असून ज्यामुळे बांधकाम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी क्रीडा विभागाचे उपसंचालक बी.श्रीनिवास, शिवाजी बोकडे, प्रल्हाद चिरमूरकर, दयानंद गावडा, रहमान तहसीलदार, महादेव पाटील, श्याम गावडा, अजित नाईक, कृष्णा गावडा, रवी नाईक, मेहबुब मुजावर, सातेरी कोकितकर आदींसह गावकरी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.