बेळगाव लाईव्ह : माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेत सीमा प्रश्नासंदर्भात चर्चा केली.
बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी आठ वाजता बारामती येथील गोविंद बाग येथील निवास स्थानी शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावरील सुप्रीम कोर्टातील दावा त्वरित सुनावणीस यावा यासाठी प्रयत्न करा अशी मागणी यावेळी करण्यात आली त्यावर काय करता येते ते पाहतो असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.
बेळगावचे सहकार महर्षी कै. अर्जुन राव घोरपडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाला 2 सप्टेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार साहेब बेळगावला येणार आहेत. याबाबतही कार्यकर्त्यानी शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा केली.
समितीच्या शिष्टमंडळात प्रकाश मरगाळे सुनील आनंदाचे विनोद आंबेवाडीकर पांडू पट्टन मारुती मरगानाचे महादेव मंगनाकर लक्ष्मण मोहिते आणि विनायक मरगाळे यांचा समावेश होता.