Monday, July 15, 2024

/

अरिहंत हॉस्पिटलमध्ये संशोधन केंद्राचे उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अरिहंत संशोधन केंद्र नावीन्यपूर्णतेचे दीपस्तंभ बनणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक संशोधनाला चालना देणार असून जागतिक वैद्यकीय समुदायामध्ये योगदान देणार आहे.

प्रयोगशाळा आधारित संशोधन आणि वैद्यकीय सराव यांच्यातील समन्वय महत्त्वपूर्ण आहे. अर्थपूर्ण प्रगती साध्य करण्यासाठी संशोधक आणि चिकित्सक यांच्यातील योग्य संवाद आणि सहकार्य आवश्यक असते. अरिहंत हॉस्पिटलच्या भविष्यातील संशोधन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी एनआयटीएम (राष्ट्रीय पारंपारिक औषध संस्था) ची दरवाजे कायम उघडी आहेत, असे प्रतिपादन आयसीएमआर व बेळगाव एनआयटीएमचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांनी केले.

अरिहंत हॉस्पिटलच्या नूतन संशोधन केंद्राचे उद्घाटन करून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. एम. डी. दीक्षित होते.

यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले, रुग्णालयाच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेच्या नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे. रुग्णालयातील संशोधन केंद्र सुधारित रुग्णसेवेचा मार्ग मोकळा करते आणि मोठ्या प्रमाणावर समाजाला महत्त्वपूर्ण लाभ देते. वैद्यकीय संशोधन आणि रुग्णांची काळजी वाढवण्याच्या उद्देशाने ही एक अत्याधुनिक सुविधा असून या संशोधन केंद्राच्या नक्कीच सर्वसामान्यांना लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश दिवाण यांनीही मनोगत व्यक्त केले.Arihant

सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. किशोर भट यांनी संशोधन व प्रयोगशाळेची प्रमुख उद्दिष्टे अधोरेखित करत विविध प्रणाली अंतर्गत रोगांमधील ऍनारोबिक बॅक्टेरियाचा सखोल अभ्यास आणि बहु-औषध प्रतिरोधक रोगजनकांच्या विरूद्ध नैसर्गिक संयुगेची प्रभावीता शोधणे समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी हॉस्पिटलच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी डॉ. निखिल दीक्षित, डॉ. वरदराज गोकाक, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव आर. टी., डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. डॉ. श्रीशैल हिरेमठ, डॉ. युवराजकुमार यड्रावी, डॉ. आराधना छत्रे, डॉ. अमृता जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, मल्लेश यड्डी यांच्यासह डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. आरझू नुराणी यांनी सूत्रसंचान करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.